शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

"कलाम वाजपेयींचा 'मास्टरस्ट्रोक'; प्रत्येक गोष्टीचे 'ते' श्रेय घेतात अन् त्यांचा विनोद होतो.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 15:56 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केले होते, असा अजब दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केले होते, अजब दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या युवा मोर्चाच्या वॉरिअर्स कार्यक्रमात केला. त्यानंतर या दाव्यावर राजकीय वर्तुळात जोरदार पडसाद उमटत आहे. याच दरम्यान शिवसेनेचे फायर ब्रँड आणि खासदार संजय राऊत यांनी देखील चंद्रकांत पाटलांच्या या अजब दाव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. . 

संजय राऊत हे पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवबाद साधला. राऊत म्हणाले,अब्दुल कलाम हा अटल बिहारी वाजपेयींचा मास्टरस्ट्रोक होता. मोदी तेव्हा राष्ट्रीय राजकारणात नव्हते. काही लोकं प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेतात आणि त्यांचा विनोद होतो. इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली होती आता ही छुप्या पद्धतीने आहे,तेव्हा फक्त राष्ट्रपतींच्या सहीने लावली होती. त्या काळातले सेलिब्रेटी कमिटेड होते, स्वातंत्र्य लढा, सामाजिक चळवळीशी संबंध होता 

भाजपला काही सवलत मिळते का?दिवसागणिक नव्या उच्चांकाने वाढत असलेल्या पेट्रोल डिझेलच्या दरवादरवाढीवर भाष्य करताना राऊत म्हणाले, महाराष्ट्र मोठे राज्य, पेट्रोल भाव फक्त छोट्या राज्यात कमी, इतर मोठ्या राज्यात बघितले नाही. मोठ्या राज्यात इंधन दरवाढ केल्याने भाजपला सवलत मिळते का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

श्रीधरन मेट्रो मॅन त्यांना शुभेच्छा आहे... मोदींवर कोणी व्यक्तीशः कोणी टीका करत नाही.युपीए सरकारच्या काळापासून मेट्रो मॅन उपाधी मिळाली.पण श्रेय आणि माणसे लाटायची, चोरायची ही नवी भूमिका आहे. 

मुख्यमंत्री दूरदृष्टीचे नेते, भविष्यात कोरोना संकट वाढू शकेल याचा त्यांनी अभ्यास केला होता. म्हणून काही गोष्टी उघडू नये असा त्यांचा आग्रह होता. विरोधकांनी धार्मिक राजकारण केल्यावर काहीसे उघडण्यात आले. 

ज्या पक्षाची जिथे ताकद तिथे त्याच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढणार असल्याचे स्पष्ट मत संजय राऊत यांनी व्यक्ते केले आहे. उदा मुंबई, कल्याण, डोंबिवलीत शिवसेनेच्या नेतृत्वाखाली एकत्रित निवडणुकांचे सूत्र ठरलेले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र राहणारचा आहे. काँग्रेसला  देखील सोबत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

राज ठाकरे यांनाही दिसेल, शिवसेनेने अयोध्येत काय केले आहे... मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर भाष्य करताना राऊत म्हणाले, राज यांना दिसेल की शिवसेनेने अयोध्येत काय केले आहे. दीड वर्षांपासून आम्ही नव्याने आंदोलन केले, चालना आम्ही दिली. त्यामुळे आज राममंदिर होताना दिसत आहे.

टॅग्स :PuneपुणेSanjay Rautसंजय राऊतchandrakant patilचंद्रकांत पाटीलPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाAPJ Abdul Kalamएपीजे अब्दुल कलामAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीNarendra Modiनरेंद्र मोदी