शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 18:53 IST

छगन भुजबळ यांनीही भाजपच्या घोषणेमुळे निवडणुकीत फटका बसल्याचं मान्य केल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Chhagan Bhujbal ( Marathi News ) : यंदाची लोकसभा निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजली. या निवडणुकीत भाजपकडून देण्यात आलेल्या 'अब की बार, चारसो पार' या घोषणेचीही मोठी चर्चा झाली. मात्र देशात सत्तेत येण्यासाठी २७२ जागांचीच गरज असताना भाजप ४०० पारचा नारा देत आहे, कारण त्यांना संविधान बदलायचं आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. हा मुद्दा समोर येताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग सत्ताधाऱ्यांवर नाराज झाल्याची चर्चा रंगत होती. अशातच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीच्या मेळाव्यात बोलताना राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनीही 'अब की बार, चारसो पार' या घोषणेचा निवडणुकीत आपल्याला फटका बसल्याची कबुली दिली आहे.

पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, "मला आपल्याला सांगायचंय की, आधीच चारशे पार...चारशे पार ही घोषणा देण्यात आली आणि संविधान बदलणार हे दलित समाजाच्या मनावर इतके बिंबले की ते काढता काढता नाकी नऊ आले. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका टीव्ही मुलाखतीत १५ ते २० मिनिटं हेच सांगत होते की आम्ही संविधान बदलणार नाही, उलट संविधान दिन साजरा करणार आहोत. मात्र या सगळ्याचा परिणाम आपल्याला आताच्या निवडणुकीत जाणवला. हे संपत नाही तोच आता मनुस्मृतीचा विषय समोर आला आहे. शाळांमध्ये मनुस्मृतीतील काही गोष्टी अभ्यासक्रमात येणार, अशी चर्चा सुरू आहे. मनुस्मृती म्हटलं की झालं मग कल्याण! वर्णव्यवस्था मान्य नाही म्हणून आम्ही मनुस्मृती जाळली आहे. असं असताना आता पुन्हा कोणीतरी हे विषय वर काढत आहे," अशा शब्दांत भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिला.

दरम्यान, आतापर्यंत विरोधकांकडून 'अब की बार चारसो पार' या भाजपच्या घोषणेचा समाचार घेतला जात असताना आता महायुतीत असणाऱ्या छगन भुजबळ यांनीही या घोषणेमुळे निवडणुकीत फटका बसल्याचं मान्य केल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भुजबळांकडून जागावाटपावरही भाष्य

"विधानसभा निवडणुकीवेळी लोकसभेसारखी खटपट होता कामा नयेत, आपल्या हक्काचा वाटा आपल्याला मिळाला पाहिजे. आपल्या पक्षाला विधानसभा निवडणुकीत ८० ते ९० जागा मिळाल्या पाहिजेत," अशी मागणी यावेळी छगन भुजबळ यांनी केली आहे.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळNarendra Modiनरेंद्र मोदीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार