शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेनंतर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 09:12 IST

Mumbai-Pune highway : मुंबई-पुणे महामार्गावर  खंडाळा बोरघाटात मध्यरात्री तीनच्या सुमारास अपघात झाला.

Mumbai-Pune highway :  मुंबई : मुंबई-पुणे महामार्गावर मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास खासगी बसला टेम्पो ट्रकने धडक दिल्याने मोठा अपघात झाला. ट्रकने धडक दिल्यानंतर बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या २० फूट खोल खड्ड्यात कोसळली. या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. या बसमधून ११ प्रवासी प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे महामार्गावर  खंडाळा बोरघाटात मध्यरात्री तीनच्या सुमारास अपघात झाला. सांगोला ते मुंबई ही खाजगी बस निघाली होती. यावेळी कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोने मागून धडक दिल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस मार्ग सोडून रस्त्याच्या बाजूला असलेल्या २० फूट खोल खड्ड्यात कोसळली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बसमधील काही प्रवासी यात जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त बसमधून प्रवासी सांगोला ते मुंबई प्रवास करत होते.  

या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी आयआरबी देवदूत पथक, खोपोली अपघातग्रस्तांना मदत करणारी टीम आणि महामार्ग पोलीस दाखल झाले. त्यांनी बसमधील अडकलेल्या बस चालकांसह प्रवाशांना सुखरूपणे बाहेर काढले. त्यानंतर जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, खंडाळा घाटात अनेक ठिकाणी खोल दरी आहेत, मात्र हा अपघात जिथं झाला, तिथं २० ते २५ फुटाचा खड्डा असल्याने बस थेट तिथेच जाऊन कोसळली.

टॅग्स :Mumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वेAccidentअपघात