Kolhapuri chappal: बघू कशी बनते कोल्हापुरी चप्पल.. आता 'प्राडा'च येणार कोल्हापुरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 12:46 IST2025-07-12T12:46:10+5:302025-07-12T12:46:27+5:30
कोल्हापूर : कोल्हापुरी चप्पल स्वत:च्या प्रदर्शनात ठेवून ते स्वत:चा ब्रँड आहे असे दाखवणाऱ्या प्राडाचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने कान ...

Kolhapuri chappal: बघू कशी बनते कोल्हापुरी चप्पल.. आता 'प्राडा'च येणार कोल्हापुरात
कोल्हापूर : कोल्हापुरी चप्पल स्वत:च्या प्रदर्शनात ठेवून ते स्वत:चा ब्रँड आहे असे दाखवणाऱ्या प्राडाचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने कान टोचल्यानंतर चूक कबूल करणाऱ्या प्राडाला आता कोल्हापुरी चप्पलची चांगलीच भुरळ पडली आहे. नेमकी ही कोल्हापुरी चप्पल बनते कशी हे पाहण्यासाठी प्राडाची एक टीम पुढील आठवड्यात कोल्हापुरात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर आणि आंतरराष्ट्रीय लक्झरी फॅशन ब्रँड प्राडा ग्रुप यांच्यात शुक्रवारी ऑनलाइन बैठक नुकतीच झाली. या बैठकीत प्राडाने महाराष्ट्रातील हस्तकला क्षेत्राशी भागीदारी करण्याची तयारी दर्शवली आहे. सांस्कृतिक ओळख आणि महाराष्ट्रातील पारंपरिक कारागीर समुदाय, विशेषतः कोल्हापुरी चप्पल उद्योग यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र चेंबरने या चर्चेत सांस्कृतिक देवाण-घेवाण, ब्रँडेड विकास आणि फेअर ट्रेड हे मुद्दे मांडले. प्राडाच्या सदस्यांनी सर्व मुद्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला. प्राडाच्या तांत्रिक तज्ज्ञांची एक टीम कोल्हापुरी चप्पल कशी तयार होते हे पाहण्यासाठी कोल्हापुरात येणार असल्याचे प्राडाकडून या बैठकीत जाहीर करण्यात आले.
प्रेरित संग्रह लाँच करणार
नामांकित कारागीर, क्लस्टर्स आणि प्रमाणित उत्पादकांशी प्राडा टीम भेट घेणार आहे. प्राडाने स्थानिक कारागिरांच्या सहकार्याने “मेड इन इंडिया- कोल्हापुरी” प्रेरित संग्रह लाँच करण्याचा मानसही व्यक्त केला. या बैठकीसाठी प्राडाच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रमुख लोरेन्झो बर्टेली, ख्रिस्तोफर बग, दिलीप गुप्ता, संगीता पाटील यांची उपस्थिती होती.