शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Jitendra Awhad "कंत्राटदार सरकारला महाराजांचा एक पुतळा...", आव्हाडांनी सरकारच्या कामाचे काढले वाभाडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 17:44 IST

Shivaji Maharaj Statue collapsed in malvan: छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना आज मालवणमध्ये घडली. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असून, आव्हांनीही टीकेची तोफ डागली.

Jitendra Awhad on Shivaji Maharaj Statue: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. सोमवारी (२६ ऑगस्ट) दुपारी ही घटना घडली. या घटनेनंतर पुतळ्याच्या गुणवत्तेवर शंका उपस्थित होत असून, महायुती सरकार टीकेचे धनी ठरले आहे. या घटनेनंतर आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महायुती सरकारच्या कामाचे वाभाडेच काढले आहेत. 

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. ३५ फुटांच्या या पुतळ्याचे ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाकडून पुतळा उभारण्याचे काम करण्यात आले होते. पण, तो पुतळा पडल्याने आता कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.  

जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'महाराज आम्हाला माफ करा'

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुतळा कोसळल्यानंतरचा फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केला आहे. आव्हाडांनी म्हटले आहे की, "छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधलेले किल्ले अजूनही भक्कम आहेत आणि 'कंत्राटदार सरकार'ला महाराजांचा एक भक्कम पुतळा उभारता आला नाही, हा यांच्या कारभाराचा हिशेब आहे", असे टीकास्त्र आव्हाडांनी डागले आहे.  

आव्हाड पुढे म्हणतात, "महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या महाराजांचा पुतळा नेमका कुणाच्या मार्गदर्शनाखाली तयार केला गेलाय? हा पुतळा उभा आणि हातात म्यानातून उपसलेसी तलवार असलेलाच का आहे? कुणालाच या पुतळ्यामध्ये काहीच चुकीचं वाटत नाही का? हे सर्व प्रश्न मी उद्घाटनानंतर उपस्थित केले होते. आज महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर त्या दिखावेगिरीचा पर्दाफाश झालाय. महाराज आम्हाला माफ करा", असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

 

विरोधकांकडून महायुती सरकार लक्ष्य

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याने महायुती सरकार टीकेचे धनी ठरले आहे. विरोधकांकडून वेगवेगळे प्रश्न पुतळ्याच्या उभारणीसंदर्भात उपस्थित केले जात आहे. कंत्राटदाराचा मुद्दाही विरोधकांनी उपस्थित केला असून, मोदींच्या हस्ते उद्घाटन व्हावे म्हणून घाई केल्याचा आरोप केला आहे. 

टॅग्स :MumbaiमुंबईShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाMahayutiमहायुती