नायगावमध्ये सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारणार - शिंदे 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 12:56 PM2024-01-04T12:56:45+5:302024-01-04T12:57:01+5:30

नायगाव (ता. खंडाळा) येथे बुधवारी जयंती समारंभात सावित्रीबाईंच्या स्मारकास अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते.

A grand memorial of Savitribai Phule will be erected in Naigaon says cm Shinde | नायगावमध्ये सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारणार - शिंदे 

नायगावमध्ये सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारणार - शिंदे 

खंडाळा (सातारा) : ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी तत्कालीन परिस्थितीत समाजसुधारणेचं काम केलं. स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनामध्ये स्वाभिमान जागृत केला.  त्यांच्या या अनमोल कार्याची महती देशाला कळावी, यासाठी त्यांचे जन्मस्थळ असलेल्या नायगाव येथे शासनाच्या वतीने दहा एकर जागा अधिग्रहित करून भव्य स्मारक उभारले जाईल आणि त्यासाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाईल,’ अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 

नायगाव (ता. खंडाळा) येथे बुधवारी जयंती समारंभात सावित्रीबाईंच्या स्मारकास अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री शंभूराज देसाई, गृहनिर्माण व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिषदेने घेतलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर इतर मागासवर्ग महामंडळाच्या महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेच्या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले.
 

Web Title: A grand memorial of Savitribai Phule will be erected in Naigaon says cm Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.