नागपूर – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. आपल्या संस्कृती नुसार दशक्रिया झाल्यावर घरातील सुरळीत कामकाज सुरू होते. पण राज्यातील राजकारण इतके सडके झाले आहे की कसलीही वाट न बघता शपथविधीचा कार्यक्रम करण्यात आला. यातूनच दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र येऊ नये हा कट शिजला, असा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात दोन्ही पक्ष विलीन होण्याबाबत चर्चा अंतिम टप्प्यात होती. आपल्या पक्षाबाबत त्यांनी भाजप किंवा मुख्यमंत्र्यांना सांगणे अपेक्षित होते का? त्यांच्या पक्षाचे निर्णय ते घेऊ शकत नव्हते की त्यासाठी भाजपची परवानगी लागत होती? अस टोला वडेट्टीवार यांनी यावेळी लगावला.
'उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूपेक्षा दोन पक्षाच्या विलीनीकरण बाबत जास्त चर्चा झाली. यातून काही लोकांना आनंद झाला. आपल्या मोठ्या नेत्याचा मृत्यू झाल्यावर दोन चार दिवस ही नेते थांबू शकले नाही यातून राजकारणात नैतिकता आणि नीतिमत्ता राहिली नाही हे महाराष्ट्र बघत आहे', अशी टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली.
अजित पवार यांच्या पक्षातील सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या नेत्यांना एनडीएसोबत राहण्याची अपरिहार्यता आहे. त्यांच्यावर विविध आरोप झाले आहेत. अशा वेळी शांत झोप लागावी यासाठी भाजपला साथ देण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही यातूनच विधान केली जात असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.अजित पवार यांच्या मृत्यूबाबत देखील विविध शंका उपस्थित केल्या जात असून, या प्रकरणी निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे याचा पुनरुच्चार वडेट्टीवार यांनी केला.
Web Summary : Vijay Vadettiwar alleges a conspiracy prevented the NCP factions from uniting after Ajit Pawar's death. He suggests discussions were underway for a merger, and some leaders benefited from the situation, lacking ethics. He also called for an impartial inquiry into Ajit Pawar's death.
Web Summary : विजय वडेट्टीवार का आरोप है कि अजित पवार की मृत्यु के बाद राष्ट्रवादी कांग्रेस के गुटों को एकजुट होने से रोकने के लिए साजिश रची गई। उन्होंने सुझाव दिया कि विलय पर चर्चा चल रही थी, और कुछ नेताओं को स्थिति से फायदा हुआ, जिनमें नैतिकता की कमी थी। उन्होंने अजित पवार की मौत की निष्पक्ष जांच की भी मांग की।