"कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प, खरोखरच शेतकऱ्यांचे...!" उद्धव ठाकरे यांचं CM फडणवीस यांना थेट आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 16:55 IST2026-03-06T16:55:15+5:302026-03-06T16:55:56+5:30
"कर्ज काढून फटाके वाजवणार हा अर्थसंकल्प आहे. त्यातून मला नाही वाटत, राज्याचे काही हीत साधले जाईल," अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

"कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प, खरोखरच शेतकऱ्यांचे...!" उद्धव ठाकरे यांचं CM फडणवीस यांना थेट आव्हान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत महाराष्ट्र राज्याचा वर्ष २०२६-२७ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी महिला वर्ग, शेतकरी वर्ग आणि अनेक विकास कामांसंदर्भात मोठ्या घोषणा केल्या आहेत. यासंदर्भात आता नेतेमंडळींच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. यातच शिवसेने (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भाष्य केले आहे. "कर्ज काढून फटाके वाजवणार हा अर्थसंकल्प आहे. त्यातून मला नाही वाटत, राज्याचे काही हीत साधले जाईल," अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, "राज्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. कर्ज काढून फटाके वाजवणार हा अर्थसंकल्प आहे. त्यातून मला नाही वाटत राज्याचे काही हीत साधले जाईल. तसेच, खरो-खरच शेतकऱ्यांचे भले करायचे असेल, तर, पात्र-अपात्र, हा जो काही शाब्दिक खेळ केला आहे, तसा करू नये. अर्थसंकल्पात २०४७ चा वारंवार उल्लेख झाला, तर आताची कर्जमुक्ती २०४७ पर्यंत तरी पूर्ण करणार का? तर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे की, 'या' तारखेपर्यंत आम्ही कर्जमुक्ती पूर्ण करू," असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे."
"दुर्दैवाने त्यानंतर कोरोना आला..." -
"आताचे मुख्यमंत्री म्हणत आहेत की, आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण करून. पण तो कोरा तर केलेला नाहीच, साधारणपणे पाच वर्षांपूर्वी आम्ही कालबहाय्य पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांची २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी केली होती आणि ती केल्यानंतर, त्यात पात्र अपात्र, अशा काही अटींचं जंजाल नव्हतं. आम्ही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती केली होती. दुर्दैवाने त्यानंतर कोरोना आला, तेव्हा आम्ही नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्यांसाठी आम्ही प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये द्यायलाही सुरवात केली होती. तेव्हा आणचं सरकार पाडलं गेलं," असे ठाकरे म्हणाले.
"सातबारा तर कोरा झालेला नाहीच, पण..." -
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, "एकूण अर्थसंकल्प बघितल्यास, सातबारा तर कोरा झालेला नाहीच, पण लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार होते, त्याचाही कुठे उल्लेक नाही. कॉन्ट्रॅक्टरसाठी मात्र टोस योजना आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी अगदी सविस्तर, कुठून कुठे मार्ग होणार आहे? किती कोटींचा होणार आहे? या कॉन्ट्रॅक्टर साठी ठोस योजना आहेत. मात्र कामगार आणि शेतकरी यांच्यासाठी मात्र हा फसवा अर्थसंकल्प आहे." एवढेच नाही तर, "हा अर्थसंकल्प केवळ विकासाचे मृगजळ दाखवणारा आहे. काही दिवासांनंतर प्रत्येकालाच कळेल, या अर्थसंकल्पाने त्याच्या आयुष्याक काय फरक पडेल?" असेही ठाकरे म्हणाले.