बुलडाणा : वातावरणात झालेल्या बदलामुळे थंडी, ताप, हात-पाय दुखणे, खोकला, डोकेदुखी अशी लक्षणं आढळून येतात. ही लक्षणं शीतज्वर, म्हणजेच कॉमन फ्लूची असू शकतात. या आजाराने गत पाच वर्षांंमध्ये ९५0 रूग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या अहवालातून पुढे आली आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, गत पाच वर्षांंमध्ये या आजाराच्या ४७ लाख ३0 हजार ४२५ रुग्णांची वैद्यकिय तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५ लाख १ हजार ८५0 संशयित रुग्ण आढळून आले, तर ८ हजार ३६५ रुग्ण या आजाराने बाधित असल्याचे निष्पन्न झाले. योग्यवेळी उपचार न घेतल्याने ९७३ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}