शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

नऊ जिल्ह्यांत कोरोनाचे ९३ टक्के अ‍ॅक्टिव्ह रुग्ण, उर्वरित राज्यातील प्रमाण सात टक्क्यांहून कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 4:20 AM

सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या यादीत ठाणे जिल्हा आघाडीवर असून त्यापाठोपाठ पुणे आणि मुंबईचा क्रमांक आहे. याशिवाय पालघर, रायगड, सोलापूर, नाशिक, जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्यातील संख्या मोठी आहे.

मुंबई : कोरोनाचा केंद्रबिंदू आता मुंबईकडून अन्य महानगरांकडे सरकत असल्याचे चित्र आहे. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत ठाण्यापाठोपाठ आता पुण्यानेही मुंबईला मागे टाकले आहे. एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी तब्बल १ लाख १२ हजार ३३६ रुग्ण राज्यातील नऊ जिल्ह्यांत असून उर्वरित सर्व जिल्ह्यांत मिळून फक्त ८,१४४ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात ८,३०८ नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या यादीत ठाणे जिल्हा आघाडीवर असून त्यापाठोपाठ पुणे आणि मुंबईचा क्रमांक आहे. याशिवाय पालघर, रायगड, सोलापूर, नाशिक, जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्यातील संख्या मोठी आहे. एकूण १ लाख २० हजार ४८० रुग्णांपैकी तब्बल १ लाख १२ हजार ३३६ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण याच नऊ जिल्ह्यांत आहेत. तर, उर्वरित महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या ८ हजार १४४ इतकीच आहे. टक्केवारीच्या प्रमाणात बोलायचे तर या नऊ जिल्ह्यांतील रुग्णांचे प्रमाण ९३.२४ टक्के इतके आहे.राज्यात शुक्रवारी ८,३०८ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ९२ हजार ५८९ झाली आहे. तर, २२१७ रुग्ण आज बरे होऊन घरी गेल्याने आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १ लाख ६० हजार ३५७ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.८१ टक्के इतके आहे.दिवसभरात झालेल्या २५८ मृत्युंपैकी मुंबई मनपा-६२, ठाणे-१२, ठाणे मनपा-९, नवी मुंबई मनपा-१४, कल्याण-डोंबिवली मनपा-१४, भिवंडी-निजामपूर मनपा-१२, मीरा-भार्इंदर मनपा-५, पालघर-१, वसई-विरार मनपा-११, रायगड-७, पनवेल मनपा-१, नाशिक-७, नाशिक मनपा-१८, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-१, जळगाव-३, जळगाव मनपा-१, पुणे-७, पुणे मनपा-२१, पिंपरी-चिंचवड मनपा-१७, सोलापूर मनपा-३, सोलापूर मनपा-६, सातारा-५, कोल्हापूर-२, रत्नागिरी-१, औरंगाबाद-२, औरंगाबाद मनपा-३, जालना-४, हिंगोली-१, लातूर मनपा-२, उस्मानाबाद-२, बीड-१, नांदेड-३, नांदेड मनपा-३, अमरावती मनपा-२, नागपूर मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्यातील १ अशी नोंद आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस