शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

८५ लाचखोरांना अटक

By admin | Updated: June 3, 2015 03:25 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चालू वर्षात केलेल्या कारवाईत ८५ जणांना रंगेहाथ पकडले. यामध्ये साधारणत: ५० टक्क्याहून अधिक लाचखोरांचे वय ४६ पेक्षा अधिक

ठाणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चालू वर्षात केलेल्या कारवाईत ८५ जणांना रंगेहाथ पकडले. यामध्ये साधारणत: ५० टक्क्याहून अधिक लाचखोरांचे वय ४६ पेक्षा अधिक आहे. तर २५ वर्षांखालील लाचखोरांची संख्या फक्त दोन असून, महसूल विभागापेक्षा लाचखोरीत गृह विभाग (पोलीस) आघाडीवर पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. यावरून शासकीय सेवेत काम करणाऱ्या लोकसेवकांच्या वाढत्या वयाबरोबर लाच स्वीकारणाऱ्यांचे प्रमाणही वाढल्याने ही एक समस्याच निर्माण होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे लाचलुचपत विभागाचे कार्यक्षेत्र हे ठाणे जिल्हा व शहरापासून पालघर जिल्हा, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे पसरले आहे. जानेवारी ते मे महिन्यात या विभागाकडे आलेल्या तक्रारीवरून शासननिर्मित ३९ विभागांतील ८५ लोकसेवकांसह खासगी लोकांना जेरबंद केले आहे. यामध्ये ४६ वर्षांवरील ४३ जणांना, २५ ते ३५ वर्षांमध्ये २० तसेच ३६ ते ४५ वर्षांमध्ये २० आणि २५ वर्षांखाली वयोगटातील २ जण जेरबंद करण्यात आले आहेत.१ जानेवारी ते ३१ मेदरम्यान राज्यात महसूल विभागातील १६०, तर त्यापाठोपाठ १४२ गृृह विभागातील (पोलीस) लोकसेवकांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. याचदरम्यान ठाणे लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईत ८३ जणांना अटक झाली. त्यामध्ये गृह विभाग आघाडीवर आहे. या विभागातील १७ जणांना लाच घेताना पकडले आहे, तर त्यापाठोपाठ महसूल विभाग आणि जिल्हा परिषदमध्ये प्रत्येकी ११-११ जणांना भ्रष्टाचाराप्रकरणी अटक झाली आहे. तर राज्य उत्पादन शुल्क विभागातील ८, वन विभाग ५, कामगार विभाग आणि महावितरण विभागातील प्रत्येकी ४, महानगरपालिका, आरटीओ, नगरपालिका ३, भूमी अभिलेख २, आदिवासी विभाग २, न्याय आणि विधी विभाग २, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, नगर परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या विभागात प्रत्येकी एकाला लाच स्वीकारताना अटक झाली आहे. (प्रतिनिधी)