शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

साखर कारखान्यांचा ८,४०० कोटी प्राप्तिकर माफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 08:39 IST

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची माहिती; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या आदेशानुसार साखर कारखान्यांवर आकारलेला प्राप्तिकर मागे घेण्यात यावा, असे परिपत्रक सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशनने (सीबीडीसी) ५ जानेवारीला काढल्याने सुमारे ८ हजार ४०० कोटी रुपये माफ झाले आहेत. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे.

देशभरातील साखर कारखान्यांचे यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात खटले सुरू होते. आता संबंधित सर्व दावे प्राप्तिकर विभागाकडे सुनावणी होऊन निकाली काढण्यात यावेत, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ४ ऑक्टोबरला आम्ही पत्र देऊन केंद्र सरकारकडे प्रयत्न करून साखर उद्योगाला संकटातून बाहेर काढावे, अशी मागणी केली होती. फडणवीस व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची १९ ऑक्टोबरला भेट घेऊन चर्चा केली. त्यानुसार केंद्र सरकारने  २५ ऑक्टोबरला परिपत्रक काढून २०१६ पासून दिलेल्या नोटिसा रद्द करण्याचा आदेश काढला.

मात्र, प्राप्तिकरासंदर्भात साखर कारखान्यांना  २०१६ पूर्वीच्याही दिलेल्या सर्व नोटिसा कायम होत्या. त्यामुळे पुन्हा फडणवीस व दानवे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने अमित शहा यांच्याशी चर्चा केली. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा सकारात्मक होते. शहा यांनी फेरआढावा घेतला. सुधारित परिपत्रक काढून साखर कारखान्यांना दिलेल्या नोटिसा रद्द करण्याचे आदेश केंद्रीय वित्त मंत्रालयाचे अवर सचिव सौरभ जैन यांनी दिले आहेत, असेही पाटील यांनी सांगितले.

राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांना दिलासामहाराष्ट्रातील ११६ साखर कारखान्यांना प्राप्तिकर भरण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. या संदर्भातील दावे १९९० पासून दाखल आहेत. नव्या परिपत्रकामुळे राज्यातील ४० लाख, तर देशातील पाच कोटी ऊस उत्पादक  शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

देशाचे पहिले सहकार मंत्री झाल्यानंतर अमित शहा यांनी साखर उद्योगासाठी घेतलेला क्रांतिकारक निर्णय आहे. या निर्णयाचे साखर उद्योगातून स्वागत होत आहे. ऊस उत्पादक शेतकरी व ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था आता अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.     - हर्षवर्धन पाटील, माजी सहकार मंत्री. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने