पीएमपीएमएलच्या कर्मचा-यांना मिळणार 8.33 टक्के दिवाळीचा बोनस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 17:43 IST2017-10-13T13:30:05+5:302017-10-13T17:43:47+5:30

पीएमपीएमएलच्या कर्मचा-यांना दिवाळीचा बोनस मंजूर करण्यात आला आहे.

8.33 percent Diwali bonus for PMPML employees | पीएमपीएमएलच्या कर्मचा-यांना मिळणार 8.33 टक्के दिवाळीचा बोनस

पीएमपीएमएलच्या कर्मचा-यांना मिळणार 8.33 टक्के दिवाळीचा बोनस

पुणे- पीएमपीएमएलच्या कर्मचा-यांना दिवाळीचा बोनस मंजूर करण्यात आला आहे. पीएमपीएमएल संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महानगरपालिका 19 कोटी, तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका 12 कोटी देणार आहे. यंदा कर्मचा-यांना 8.33 टक्के बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मुंढे यांचा पीएमपीएल कर्मचा-यांना बोनस देण्यासाठी पूर्णपणे विरोध होता. या आधीही त्यांनी हे स्पष्टपणे सांगितले होते. मात्र आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोनस 8.33 टक्के बोनस जाहीर करण्यात आला आहे. यासाठी पुणे महापालिका 19 कोटी, तर पिंपरी महापालिका 12 कोटी देणार आहे. मात्र या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, मला बोनस घेणे योग्य वाटत नाही. मी मुंबईत होतो तेव्हा पण घेतले नाही आणि आताही घेणार नाही, असे स्पष्ट केले.

बैठकीविषयी बोलताना मुंढे म्हणाले की, कर्मचारी वर्गाला सानुग्रह अनुदान आणि सर्व रक्कम मिळून आता 32 कोटी द्यावे लागणार आहे. आता ही रक्कम पुणे 19 कोटी आणि पिंपरी महापालिका 12 कोटी अशी दोन्ही महापालिका रक्कम देणार आहेत. यापूर्वीच्या नियमानुसार मी निर्णय घेतले असून पुढील दिवाळीत सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय पीएमपीएमएलची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता व्यस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष निर्णय घेणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

मंडळ तोड्यात असल्याने यावर्षी बोनस देण्यात येऊ नये, अशी माझी भूमिका होती, मात्र आता दोन्ही पालिका बोनसचे पैसे देणार असल्याने व संचालक मंडळाचा निर्णय झाल्याने बोनस देण्यात येणार आहे, मात्र पुढील वर्षी बोनस द्यायचा की नाही हा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार हा पीएमपीच्या संचालकाला असणार आहे, तसा ठराव आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती मुंढे यांनी दिली. पुढील वर्षी मंडळाची आर्थिक तिथी चांगली असेल तरच बोनस देण्यात येईल असेही मुंढे यांनी स्पष्ट केले, त्यामुळे आता पीएमपीएलमधील कर्मचारी मंडळाला किती नफा मिळून देणार यावर त्यांचा बोनस अवलंबून आहे.​​​​​​​
 

Web Title: 8.33 percent Diwali bonus for PMPML employees