एकाकी महिलेला बेशुद्ध करून ८ लाखांची लूट

By Admin | Updated: May 25, 2014 05:26 IST2014-05-25T05:26:54+5:302014-05-25T05:26:54+5:30

घरात गृहिणी एकाकी असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी तिला बेशुद्ध करून घरातून आठ लाख रूपयांचा ऐवज लुटला.

8 lac robbery of lonely woman unconscious | एकाकी महिलेला बेशुद्ध करून ८ लाखांची लूट

एकाकी महिलेला बेशुद्ध करून ८ लाखांची लूट

मुंबई : घरात गृहिणी एकाकी असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी तिला बेशुद्ध करून घरातून आठ लाख रूपयांचा ऐवज लुटला. चिंचपोकळीच्या संकल्प इमारतीत काल दिवसाढवळ्या हा गुन्हा घडला. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तूर्तास पोलीस अज्ञात चोरट्यांची रेखाचित्रे तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. सुषमा सुर्वे (३४) असे या महिलेचे नाव आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पती, मुलांसह सुषमा राहातात. काल सकाळी त्यांचे पती संदीप कामावर निघून गेले. दरम्यान संध्याकाळी पाच वाजता शेजारी राहाणार्‍या श्वेता पाटील सुषमा यांच्या घरी गेल्या. दिवसभर सुषमा यांची काहीच जाग नसल्याने विचारपूस करावी, असे श्वेता यांच्या मनात होते. बराच वेळ त्यांनी बेल वाजवून पाहिली. मात्र आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता. आत शिरल्यावर त्यांना सुषमा बेशुद्धावस्थेत आढळून आल्या. शेजार्‍यांनी पोलिसांना कळवून सुषमा यांना रुग्णालयात दाखल केले. अज्ञात चोरांनी आपले हात-पाय बांधून मारहाण केल्याचे सुषमा यांना पोलिसांना शुद्धीवर आल्यानंतर सांगितले. दरम्यान आपल्या घरात आठ लाखांची चोरी झाल्याची तक्रार सुषमा यांचे पती संदीप यांनी दिली आहे.

Web Title: 8 lac robbery of lonely woman unconscious