शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
5
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
6
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
7
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
8
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

Video: ७ किमी वाहनांच्या रांगा, FasTag नसल्यानं डबल वसुली; किणी टोल नाक्यावर मनसे नेत्याचा राडा

By प्रविण मरगळे | Published: February 17, 2021 12:11 PM

MNS Agitation on Toll Naka for traffic jam due to collection double charge from car owner: मनसे नेत्या रूपाली पाटील ठोंबरे या कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने येत असताना, त्यांना अशाप्रकारे वाहतूक कोंडीचा फटका बसला.

ठळक मुद्देजवळपास ७ किमी वाहनांच्या रांगा लागल्यामुळे मनसेने आक्रमक पवित्रा घेत वाहनं टोल न घेता सोडण्यास सांगितली.किणी टोल नाक्यावर फास्टटॅगवरून लोकांची पिळवणूक थांबवली पाहिजेपहिल्यांदा टोल नाक्यावरील वाहनांच्या रांगा बंद करा अन्यथा मनसेला याबाबत आंदोलन करावं लागेल

कोल्हापूर – फास्टटॅगसाठी मुदतवाढ दिली जाणार नसल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी स्पष्ट केलं, त्यामुळे १५ तारखेपासून ज्यांच्याकडे फास्टटॅग नाही अशा वाहनांना दुप्पट टोल भरावा लागत आहेत. अशातच अनेक ठिकाणी वाहनांच्या प्रचंड मोठ्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तांत्रिक अडचणींमुळे फास्टटॅग असूनही टोल नाक्यावर वाहनांची गर्दी होतेय, त्यातच दुप्पट टोल आकारणीमुळे आता टोल नाक्यावर गोंधळाचं वातावरण दिसून येत आहे.(MNS Rupali Patil Thomabre Aggressive at Kini Toll Naka over traffic jam due to Fastag System)  

मनसे नेत्या रूपाली पाटील ठोंबरे या कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने येत असताना, त्यांना अशाप्रकारे वाहतूक कोंडीचा फटका बसला. कोल्हापूरच्या किणी टोल नाक्यावर रूपाली पाटील यांनी टोल कर्मचाऱ्यांना याबाबत जाब विचारला, जवळपास ७ किमी वाहनांच्या रांगा लागल्यामुळे मनसेने आक्रमक पवित्रा घेत वाहनं टोल न घेता सोडण्यास सांगितली. फास्टटॅग असूनही लोकांना रांगेत राहावं लागत असेल तर त्याचा उपयोग काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

याबाबत मनसे नेत्या रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, किणी टोल नाक्यावर फास्टटॅगवरून लोकांची पिळवणूक थांबवली पाहिजे, फास्टटॅग ही लोकांना सुविधा देण्यासाठी आहे की मारायला? जवळपास ७ किमी वाहनांच्या रांगा आहेत, त्यात रुग्णवाहिका अडकून लोकांचे जीव जातील. पहिल्यांदा टोल नाक्यावरील वाहनांच्या रांगा बंद करा अन्यथा मनसेला याबाबत आंदोलन करावं लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.

नॅशनल हायवेचा वापर करणाऱ्यांना फास्टटॅग बंधनकारक

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने महामार्ग वापर करणाऱ्या वाहनधारकांना फास्टटॅग बंधनकारक केलं आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी याआधी मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार १५ फेब्रुवारीमध्ये रात्रीपासून अंमलबजावणी करण्यात आली आहे. वाहनचालकांचा वेळ वाचण्याबरोबरच इंधनाची बचत होत आहे. टोल नाक्यांवरील गर्दी कमी करण्याचा उपाय म्हणून Fast Tag प्रणाली वाहनधारकांना अनिवार्य करण्यात आली आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर फास्टटॅग यंत्रणा बसविण्यात आली.

किणी टोलनाक्यावर वाहनांची गर्दी

किणी येथील टोल नाक्यावरील आठ लेनपैकी सहा लेन फास्टटॅगसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. दोन्ही बाजूला एक एक लेन फास्टटॅग नसणाऱ्या वाहनधारकांसाठी ठेवण्यात आली. मात्र,१५ फेब्रुवारीपासून दुप्पट टोल भरावा लागत आहे. यामुळे वादावादी होत असल्याने वाहतूक खोळंबून राहत आहे, तर टोल नाक्यावर दोन्ही बाजूला वाहनाच्या रांगा लांबपर्यंत पोहचतात. टोल कर्मचारी व वाहनधारकांच्यात वारंवार वादावादी सुरू राहिल्याने पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर टोल नाक्याजवळ फास्टटॅग बसण्यासाठी उभारण्यात आलेल्या स्टॉलवर वाहनधारक थांबवून चौकशी करून बसवून घेत असल्याचे चित्र पाहावयाला मिळत होते.

टॅग्स :MNSमनसेFastagफास्टॅगtollplazaटोलनाकाNitin Gadkariनितीन गडकरी