शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-व्हॅन धडकेत ७ ठार

By admin | Updated: December 2, 2014 04:26 IST

रधाव ट्रकची ओम्नी व्हॅनला जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सात जण जागीच ठार

कुरूम/मूर्तिजापूर (जि़ अकोला) : भरधाव ट्रकची ओम्नी व्हॅनला जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सात जण जागीच ठार, तर आठ जण जखमी झाले़ मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश आहे़ हा अपघात सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील नवसाळ फाट्याजवळ घडला़ व्हॅनमधील खान कुटुंब पासपोर्ट काढण्यासाठी नागपूरला निघाले होते़मृतांमध्ये आसिफ खान नूर खान (३९), इर्शाद खान नूर खान (३२), इस्माईल खान सत्तार खान (४२), नगमा तरन्नूम आसिफ खान (३२), अब्दुल मुतालिक आसिफ खान (५), मरयम फातेमा आसिफ खान (४), मुकसिद खान इस्माईल खान (३) यांचा समावेश आहे़अकोला येथील खान कुटुंबीय पासपोर्ट काढण्यासाठी मारुती व्हॅनने सोमवारी पहाटे नागपूरकडे रवाना झाले होते. व्हॅनमध्ये चालकासह तब्बल १५ जण प्रवास करीत होते. व्हॅन नवसाळ फाट्याजवळ आल्यानंतर अमरावतीहून अकोल्याकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की, यात व्हॅनचा अक्षरश: चुराडा झाला. यात खान कुटुंबातील तीन पुरुष, तीन बालके व एक महिला असे सात जण जागीच ठार झाले, तर अन्य आठ जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नंदकुमार काळे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले़ पोलिसांनी व्हॅनमध्ये अडकलेले मृतदेह व जखमींना बाहेर काढले. जखमींना अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी ट्रक जप्त केला असून, फरार झालेल्या ट्रकचालकाविरुद्ध माना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)