शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात दररोज 7 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; 6 महिन्यांत 1307 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 11:03 IST

कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या समस्या संपलेल्या नाहीत

मुंबई : राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करुनही शेतकऱ्यांच्या समस्या संपलेल्या नाहीत. जानेवारीपासून आतापर्यंत राज्यातील 1307 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. म्हणजेच गेल्या सहा महिन्यांमध्ये दररोज 7 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. गेल्या वर्षी फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र तरीही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. गेल्या वर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत 1398 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. यंदाच्या वर्षाचा विचार केल्यास हा आकडा 91 नं खाली आला आहे. मात्र राज्याच्या विविध भागांचा विचार करता आत्महत्यांचं प्रमाण वाढलं आहे. मराठवाड्यात गेल्या सहा महिन्यांमध्ये 477 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यांमध्ये मराठवाड्यातील 454 शेतकऱ्यांनी त्यांचं आयुष्य संपवलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होम ग्राऊंड असलेल्या विदर्भातील परिस्थितीदेखील चिंताजनक आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये विदर्भात 598 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. राज्य सरकारनं गेल्या वर्षी कर्जमाफीची घोषणा केली. आतापर्यंत जवळपास 38 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. मात्र अद्यापही लाखो शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफीचा लाभ पोहोचलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जुन्या कर्जाची परतफेड न केल्यानं बँका शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज देण्यास तयार नाहीत. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.  

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याMaharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेस