शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
4
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
5
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
6
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
7
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
8
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
9
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
10
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
12
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
13
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
14
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
15
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
16
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
17
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
18
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
19
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
20
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरमध्ये ६९ टक्के मतदान

By admin | Updated: November 2, 2015 03:11 IST

सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांवर केलेली आगपाखड, राजकीय, वैयक्तिक आरोपांच्या झडलेल्या फैरी आणि राजकीय नेत्यांनी निर्माण केलेली व्यक्तिगत प्रतिष्ठा यामुळे संपूर्ण

कोल्हापूर : सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांवर केलेली आगपाखड, राजकीय, वैयक्तिक आरोपांच्या झडलेल्या फैरी आणि राजकीय नेत्यांनी निर्माण केलेली व्यक्तिगत प्रतिष्ठा यामुळे संपूर्ण राज्यभर गाजलेल्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी रविवारी अपूर्व, अत्यंत चुरशीने सरासरी ६८.८२ टक्के मतदान झाले. ही निवडणूक केवळ कोल्हापूर शहरावर सत्ता कोणाची, हे ठरविणारी नसून, भविष्यातील राज्य सरकारच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली. सर्वच केंद्रांबाहेर कोल्हापूरकरांनी गर्दी करून मोठ्या उत्साहाने मतदान केले. पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडले. कॉँग्रेस, राष्ट्रवादीसह राज्यात सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेनेने ही निवडणूक वैयक्तिकदृष्ट्या प्रतिष्ठेची बनविली असल्याने, केवळ कोल्हापूर जिल्ह्याचेच नाही, तर संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे वेधले गेले आहे. सकाळी आठ वाजता मतदान केंद्रावर रांगा लागल्या. शहरातील ८१ प्रभागांत ही निवडणूक होत असून, सर्व ३७८ मतदान केंद्रांवर मतदारांनी अक्षरश: रांगा लावून मतदान केले. एक केंद्रावर सरासरी १२०० ते १४०० मतदान होते. मतदानाची प्रक्रिया संथपणे सुरू राहिल्याने गर्दी वाढली. मतदानाची गती अगदीच संथ होती, खोली क्रमांक नीट न कळल्याने वेळ खूप गेला. (प्रतिनिधी) दुबार नावांचा घोळ कायम शहरातील ८१ प्रभागांत दुबार नावे असलेल्या मतदारांची संख्या १७ हजार इतकी आहे. दुबार नावे कमी करण्याचा अधिकार महापालिका अधिकाऱ्यांना नसल्याने ती तशीच यादीत राहिली आहेत, परंतु ज्यांचे नाव दुबार म्हणून नोंदले गेले, त्या मतदारांना घराजवळच्या मतदान केंद्रावर आणि तेही एकाच ठिकाणी मतदान करण्यास परवानगी दिली होती, परंतु काही मतदान केंद्रांवर केंद्राध्यक्षांनी अशा दुबार नाव असलेल्या मतदारांना मतदानच करू न देण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे मतदार आणि केंद्राध्यक्ष यांच्यात वाद होत राहिला. विशेषत: साळोखेनगरमधील शिवशक्ती हायस्कूलमध्ये असे प्रकार घडले.टॅब, लॅपटॉप आणि मोबाइल अ‍ॅपपूर्वी मतदान बूथवर मतदारांची नावे शोधण्यासाठी उमेदवारांचे कार्यकर्ते याद्या घेऊन बसलेले असत, परंतु या निवडणुकीत याद्यांची जागा नव्या तंत्रज्ञानाने घेतली. मतदाराचे नाव शोधण्यासाठी टॅब, लॅपटॉप आणि मोबाइल अ‍ॅपचा वापर करण्यात आला.रुईकर कॉलनीत वादावादी दुपारी रुईकर कॉलनी येथील हिंद विद्यामंदिर केंद्रावर भाजपचे काही कार्यकर्ते डोक्यावर पक्षाची टोपी व गळ्यात पक्षाचा स्कार्फ घालून गेल्यामुुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले. कार्यकर्ते थेट केंद्रात घुसल्याने विरोधी उमेदवारांनी आक्षेप घेतला. यावेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांत वादावादी झाली. पोलिसांनी यात हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना बाहेर काढले.