नवीन महाबळेश्वरमधील ६७ गावे ‘इको सेन्सिटिव्ह’, नव्याने २९४ गावांसाठी एमएसआरडीसीची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 11:12 IST2025-04-04T11:12:03+5:302025-04-04T11:12:21+5:30

'Eco-Sensitive Zone: सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणाच्या शेजारीच कोयना बॅकवॉटरला लागून असलेल्या नवीन महाबळेश्वर गिरिस्थान प्रकल्पात नव्याने २९४ गावांचा समावेश करण्याला राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली.

67 villages in new Mahabaleshwar declared 'eco-sensitive', | नवीन महाबळेश्वरमधील ६७ गावे ‘इको सेन्सिटिव्ह’, नव्याने २९४ गावांसाठी एमएसआरडीसीची नियुक्ती

नवीन महाबळेश्वरमधील ६७ गावे ‘इको सेन्सिटिव्ह’, नव्याने २९४ गावांसाठी एमएसआरडीसीची नियुक्ती

- अमर शैला
मुंबई : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणाच्या शेजारीच कोयना बॅकवॉटरला लागून असलेल्या नवीन महाबळेश्वर गिरिस्थान प्रकल्पात नव्याने २९४ गावांचा समावेश करण्याला राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली. त्यातील ६७ गावे ही केंद्र सरकारच्या इको सेन्सिटिव्ह झोन सूचीतील आहेत. तर आतापर्यंत या गिरिस्थान प्रकल्पात ५२९ गावे समाविष्ट केली असून, यातील २३७ गावे ही इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये मोडत असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील गावांचाही यात समावेश आहे.

राज्य सरकारने नव्याने मंजुरी दिलेल्या गावांमुळे आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) महाबळेश्वर, पाटण, सातारा, जावळी या तालुक्यांतील तब्बल ५२९ गावांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती झाली आहे. एमएसआरडीसीने यापूर्वीच नवीन महाबळेश्वर गिरिस्थानात समाविष्ट केलेल्या २३५ गावांच्या अधिसूचित क्षेत्राचा प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे.

साताऱ्यातील ५२९ गावांसाठी प्राधिकरण
लवकरच हा आराखडा अंतिम केला जाणार आहे. आता २३५ गावांनजीक असलेल्या आणखी २९४ गावांचाही या प्रकल्पात नव्याने समावेश केला आहे. 
या २९४ गावांचे एकूण क्षेत्रफळ ९४,४०४ हेक्टर म्हणजेच ९४४ चौ. किमी एवढे आहे. यापूर्वीच्या २३५ या गावांचे एकूण क्षेत्र १,१५,३०० हेक्टर एवढे आहे. 
या नव्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याने साताऱ्यातील ५२९ गावांतील २,०९,७०० हेक्टर म्हणजेच तब्बल २०९७ चौ. किमी क्षेत्रासाठी एमएसआरडीसी नियोजन प्राधिकरण असेल. 

जैवविविधतेला बाधा
 या प्रकल्पामुळे या जैवविविधतेला बाधा पोहचेल. अत्यावश्यक नसलेला हा प्रकल्प रद्द करून पर्यावरणाचे संरक्षण करावे, अशी मागणी पर्यावरण अभ्यासक आणि वनस्पतितज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांनी केली आहे.  

या ६७ गावांचा समावेश
जावळी तालुका - आडोशी, आगलावेवाडी, धनकवडी, दिवदेववाडी, जुंगटी, करंडी तर्फे मेढा, खिरखंडी, कुंभारगणी, कुसापूर, कुसवडे, माडोशी, मालचौंडी, मालदेव, मोळेश्वर, मामुर्डी, मेट इंदवली, मोहाट, मोरावळे, नरफदेव, निझरे, पाली तर्फे तांब, पिंपरी तर्फे मेढा, सावरत, सायली, ताकवली, तांबी, तांबी तर्फे मेढा, वाघेश्वर, वाहिटे, वासोटा 
पाटण - आंबावणे, आंब्रुळे, आसावळेवाडी, चाफेर, ढोकावळे, डिचोळी, घाणाव, गोकुळ तर्फे हेळवाक, हुंबरवाडी, काळकेवाडी, कावरवाडी, मालोशी, मणेरी, मार्लोशी, मसतेवाडी, मिरगाव, नाटोशी, नावडी, नवजा, पुनवळी, रुवळे, शिरशिंगे, तळीये, तोंडोशी, तोरणे, झाडोळी, झाकडे. 
सातारा- आगुडेवाडी, आकले, भांबावळी, चिंचणी, गोगावळेवाडी, जोतिबाचीवाडी, कामठी, पाटेघर, वेळे, येवतेश्वर 

Web Title: 67 villages in new Mahabaleshwar declared 'eco-sensitive',

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.