शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
2
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
3
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
4
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
5
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
6
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
7
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
8
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
9
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
10
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
11
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
12
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
13
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
14
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
15
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
16
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
17
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
18
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
19
Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी अपडेट, चौथी संशयित कार जप्त, कुठं सापडली? 
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 08:00 IST

एका रात्रीत ३,८०० गावांना दणका; सोलापुरात सीना नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी; विदर्भातील तीन जिल्ह्यांत नदी-नाले तुडुंब

मुंबई : पावसाची वाट पाहणाऱ्या मराठवाड्यात गेल्या पंधरा दिवसांत सरासरीपेक्षा ६०% जास्त  पाऊस झाल्याने पूरस्थिती ओढावली. त्यात भर म्हणजे मध्य महाराष्ट्रातही पावसाचा कहर सुरू आहे. त्यामुळे मराठावाडा जलमय झाला असून, दोन आठवड्यांत मराठवड्याचे चित्रच बदलले आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात सरासरीपेक्षा २० टक्के अधिक पाऊस झाला आहे.

रविवारीही मराठवाड्यासह, नाशिक, जळगाव, नंदुरबार, पुणे, अहिल्यानगर, मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघर जिल्ह्यांना पावसाने झोडपले. सोलापुरात सीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नाशिकमध्ये गोदावरीचा पूर कायम आहे. 

विशेष अधिवेशन घ्या

राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ठोस निर्णय व्हावेत, यासाठी राज्य विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे, अशी मागणी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी रविवारी राज्यपालांना पत्र पाठवून केली आहे.

महाराष्ट्रात आज कुठे कोणता अलर्ट?

ऑरेंज अलर्ट : मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, पुणे यलो अलर्ट : नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

३० सप्टेंबर : यलो अलर्ट : मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड

देवस्थानांकडून मदत

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून मुख्यमंत्री सहायता निधीस १ कोटीची मदत

शेगाव : श्री गजानन महाराज संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी १.११ कोटीची मदत

गुजरातसह पश्चिम भारतात आज जोरधारा

या नकाशावरून दिसते की पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र तसेच गुजरात येथे आज जोरधारा आहेत. काही भागांत ऑरेंज तर काही भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  

सीना, गोदा, पूर्णेस पूर

सहा वर्षांत पहिल्यांदाच गोदावरीला मोठा पूर, सोलापुरातील गावे पुन्हा पाण्यात 

पावसाचा ट्रेंड बदलला?

भारतात पावसाचा ट्रेंड बदलत चालला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. १९७१ ते २०२० च्या सरासरी पावसाचा ट्रेंड (पहिला नकाशा) पाहिला तर मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग, जळगाव, नंदुरबार या भागात कमी पाऊस होता. यंदा १ जून ते २६ सप्टेंबरपर्यंतचा ट्रेंड (दुसरा नकाशा) पाहिला तर या भागात जास्त पाऊस झाल्याचे दिसते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Marathwada, Central Maharashtra See 60% Excess Rain; Orange Alert for 6 Districts

Web Summary : Marathwada faces floods with 60% excess rain. Central Maharashtra also hit hard. Maharashtra records 20% above-average rainfall. Orange alert issued for Mumbai, Thane, Nashik, Pune. Donations pour in for relief efforts.
टॅग्स :RainपाऊसfloodपूरMaharashtraमहाराष्ट्र