राज्यातील ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; नागपूर, संभाजीनगर, जळगाव, नांदेड, पालघरमधील अधिकारी बदलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 21:29 IST2025-03-18T20:58:12+5:302025-03-18T21:29:14+5:30

राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

6 IAS officers transferred in the state Officers in Nagpur, Sambhajinagar, Jalgaon, Nanded, Palghar changed | राज्यातील ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; नागपूर, संभाजीनगर, जळगाव, नांदेड, पालघरमधील अधिकारी बदलले

राज्यातील ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; नागपूर, संभाजीनगर, जळगाव, नांदेड, पालघरमधील अधिकारी बदलले

राज्यातील सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या आहेत. नागपूरच्या अतिरिक्त आयुक्तांना मुंबईत बढती देण्यात आली असून आंचल गोयल यांना मुंबईच्या जिल्हाधिकारीपदी संधी देण्यात आली आहे. नागपूरच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. 

२ माजी आमदारांसह ३ नगरसेवकांनी हाती धरलं 'धनुष्यबाण'; मुंबईत शिंदेंचा ठाकरेंना धक्का

राज्यातील सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नागपूर, जळगाव, नांदेड, पालघर आणि गडचिरोलीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर बदली करण्यात आली आहे.

या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या

रणजित मोहन यादव सहाय्यक जिल्हाधिकारी, कुरखेडा उपविभाग, गडचिरोली यांना प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, गडचिरोली येथे आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली येथे नियुक्ती करण्यात आली आहे. 

करिश्मा नायर प्रकल्प संचालक यांची नाशिक महानगरपालिका, नाशिक येथे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कवली मेघना यांची जिल्हा परिषद, नांदेड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आंचल गोयल यांची मुंबई शहर, मुंबई येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अंकित यांची छत्रपती संभाजी नगर येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मीनल करनवाल यांची जिल्हा परिषद, जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

Web Title: 6 IAS officers transferred in the state Officers in Nagpur, Sambhajinagar, Jalgaon, Nanded, Palghar changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.