शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

राज्यात स्वाइन फ्लूचे ५२ बळी; आणखी १३ जण व्हेंटिलेटरवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 06:32 IST

उन्हाचा चढता पारा आणि बदलते वातावरण, यामुळे राज्यातील स्वाइन फ्लूचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे.

मुंबई : उन्हाचा चढता पारा आणि बदलते वातावरण, यामुळे राज्यातील स्वाइन फ्लूचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. १ जानेवारी ते १० मार्च या कालावधीत राज्यात स्वाइन फ्लूमुळे राज्यभरात ५२ बळी गेले आहेत, तर १३ जण व्हेंटिलेटरवर आहेत. याखेरीज, सध्या रुग्णालयात २४९ रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. यात नाशिकमध्ये सर्वाधिक १५ मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे, तर राज्यात सध्या ६७५ स्वाइन फ्लूचे रुग्ण असल्याचे आढळले आहे.राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख २८ हजार ४१४ रुग्णांना तपासण्यात आले, त्यापैकी ७ हजार १३३ संशयित फ्लू रुग्णांना आॅसेलटॅमिवीर गोळ्या दिल्या. पुणे येथील ११ तर नागपूर येथील दोन रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत गतवर्षी महाराष्ट्रात स्वाइन फ्लूने ४ जणांचा बळी घेतला होता आणि १५ रुग्णांची नोंद झाली होती. यंदा उद्रेक किती भयंकर आहे, याची कल्पना या आकड्यांवरून येते.स्वाइन फ्लूविषयक प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राज्यभरात नियमित सर्वेक्षण, फ्लू सदृश्य रुग्णांवर वर्गीकरणानुसार विनाविलंब उपचार, खासगी रुग्णालयांना स्वाइन फ्लू उपचारांची मान्यता, गरजू रुग्णांना मुख्यमंत्री निधीतून तरतूद, मोफत निदान सुविधा, महाराष्ट्र साथरोग प्रतिबंध व नियंत्रण तांत्रिक समितीची स्थापना अशा विविध उपाययोजना सुरू आहेत.स्वाइन फ्लूशी दोन हात करण्यासाठी एच-१, एन-१ ची प्रतिबंधात्मक लस आता उपलब्ध असली, तरी २००९ पासून साऱ्या जगावर हल्ला चढविणाऱ्या स्वाइन फ्लूची दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या दहा वर्षांत एकट्या देशात या संसर्गाने हजारो बळी घेतले आहेत. जगभरातील स्वाइन फ्लूच्या बळींचा आजवरचा आकडा लाखांहून अधिक आहे.जिल्हा/मनपा मृत्यूनाशिक १५नागपूर ९पुणे मनपा ६अमरावती, मुंबई, पुणे ग्रामीण प्रत्येकी ३कोल्हापूर, औरंगाबाद, सातारा प्रत्येकी २सिंधुदुर्ग, अहमदनगर, भंडारा, जळगावसोलापूर, वसई-विरार, पालघर प्रत्येकी १एकूण ५२ही आहेत स्वाइन फ्लूची लक्षणेस्वाइनच्या संशयित रुग्णांमध्ये तीव्र ताप, कोरडा खोकला, नाकातून पाणी वाहणे, शिंका येणे, घशामध्ये खवखव होणे, थकवा आणि काही वेळेस जुलाब किंवा पोटदुखी छातीत दुखणे, खोकल्यातून रक्त पडणे, दम लागणे, अतितीव्र ताप, शरीरातील पाणी कमी होणे आदी लक्षणे आढळून येतात.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूDeathमृत्यू