शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

राज्यभरात ४ वर्षांत अपघातात ५१ हजार जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 4:28 AM

गेल्या ४ वर्षांमध्ये राज्यातील विविध महामार्ग व शहरांमध्ये २ लाख १,१५५ अपघात झाले. यामध्ये ५१ हजार १०४ जणांचा मृत्यू झाला, तर ८८ हजार ३६६ वाहनधारक कायमचे जायबंदी झाले आहेत.

जमीर काझी मुंबई : गेल्या ४ वर्षांमध्ये राज्यातील विविध महामार्ग व शहरांमध्ये २ लाख १,१५५ अपघात झाले. यामध्ये ५१ हजार १०४ जणांचा मृत्यू झाला, तर ८८ हजार ३६६ वाहनधारक कायमचे जायबंदी झाले आहेत. ४ वर्षांच्या तुलनेमध्ये गेल्या वर्षी मात्र अपघात व मृत्यूच्या प्रमाणात घट झाली आहे. २०१७ मध्ये अपघाताच्या एकूण ३५ हजार ८४५ घटना घडल्या. त्यामध्ये १२ हजार २१५ जणांचा मृत्यू झाला.महामार्ग पोलीस व वाहतूक नियंत्रण शाखेकडून राबविल्या जाणाºया उपाययोजनांमुळे अपघाताच्या आकडेवारीचा आलेख कमी होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, तरीही सुरक्षित वाहतुकीसाठी अद्याप जनजागृतीची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.महाराष्टÑात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ या वर्षामध्ये ३५ हजार ८४५ अपघाताच्या घटना घडल्या. त्यामध्ये १२ हजार २१५ मृत्यू, तर अनुक्रमे २०,४९१ व ११,६८५ जण गंभीर व किरकोळ जखमी झाल्याची नोंद पोलिसांच्या दफ्तरी आहे. २०१५च्या तुलनेत अपघाताची संख्या ४ हजार २३ ने कमी झाली आहे, तर अपघाती मृत्यूचे प्रमाण ७२० ने कमी झाले आहे. २०१४ मध्ये ६१ हजार ६२७ अपघात व १२ हजार ८०३ जणांचा मृत्यू झाला होता. २०१५ मध्ये हेच प्रमाण अनुक्रमे ६३ हजार ८०५ व १३,१५१ इतके होते.एक्स्प्रेस-वेवरील अपघातांत वाढमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गेल्या २ वर्षांमध्ये एकूण ६४१ अपघाताच्या घटना घडल्या. त्यामध्ये १८६ जणांचा मृत्यू झाला. २०१६ मध्ये २८१ अपघातांत ९७ जण ठार झाले होते, तर १५३ गंभीर जखमी होते. २०१७ मध्ये अपघाताची संख्या ३६० पर्यंत वाढली असली, तरी ८९ मृत्यू तर १०५ गंभीर जखमी झाले. किरकोळ अपघात व किरकोळ जखमींची संख्या अनुक्रमे १५६ व ४४ इतकी आहे.सुरक्षित व अपघातविरहित वाहतुकीसाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असून, त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. वाहनधारकांनी शिस्त व नियमांची अंमलबजावणी केल्यास दुर्घटनेचे प्रमाण आणखी कमी होईल.- आर. के. पद्मनाभन, अपर महासंचालक,वाहतूक, महामार्ग राज्य पोलीस

टॅग्स :Accidentअपघात