शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

मुंबईत ५०० चौ. फुटांसाठी मालमत्ता कर पाच वर्षे माफ

By admin | Updated: July 7, 2017 05:06 IST

मुंबई महापालिका निवडणुकीत जाहीरनाम्यातून ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ व ७०० चौरस फुटांपर्यंतच्या

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत जाहीरनाम्यातून ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ व ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांच्या मालमत्ता करात सवलत देण्याचे वचन पाळण्यासाठी शिवसेनेने त्याबाबतचा ठराव गुरुवारी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत मंजूर केला. मात्र आयुक्त अजय मेहता आणि राज्याच्या नगरविकास खात्याने हिरवा कंदील दाखवला तरच शिवसेनेला त्याची अंमलबजावणी करून आपले वचन पाळता येणार आहे. शिवसेनेने मालमत्ता करातील सवलतीचे वचन दिले असले तरी पालिकेच्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद नसल्याने शिवसेनेची अडचण झाली. भाजपाने यावरून शिवसेनेची खिल्ली उडवण्यासही सुरुवात केल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे सभागृह नेते यशवंत जाधव यांनी मालमत्ता करात सूट देण्याची ठरावाची सूचना पालिका सभागृहपुढे आज मांडली. ही सूचना महासभेत मंजूर होऊन आता प्रशासनाच्या अभिप्रायासाठी आयुक्त अजय मेहता यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. आयुक्त ही सूचना राज्याच्या नगरविकास खात्याकडे पाठवण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेची वचनपूर्ती अखेर राज्य सरकारच्या मंजुरीवर अवलंबून आहे. सन २०१० पासून मुंबईत भांडवली मूल्यावर आधारित करप्रणाली लागू करण्यात आली आहे. ही करप्रणाली लागू होत असताना पहिल्या पाच वर्षांमध्ये ५०० चौरस फुटांच्या घरांना कर माफ करण्यात आला होता. २०१७ च्या पालिका निवडणुकीत मतदारांना खूश करण्यासाठी शिवसेनेने ही सवलत आणखी पाच वर्षे सुरू ठेवण्याची घोषणा केली. तसेच ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांच्या मालमत्ता करातही ६० टक्क्यांपर्यंत सूट देण्याचे वचन दिले. मात्र सत्ता स्थापन होऊन तीन महिने उलटले तरी मुंबईकरांना या सवलतीचा लाभ देण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे भाजपाने या घोषणेची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली होती. या वचनाची पूर्तता न केल्यास त्याचे परिणाम आगामी निवडणुकांवर होतील, याचा अंदाज आल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांच्या बैठकीत याचा आढावा घेतला. तसेच प्रस्ताव लवकरच पालिकेच्या पटलावर आणण्याचे आदेशही शिवसेनेच्या वर्धापन दिनी त्यांनी आपल्या नगरसेवकांना दिले करमाफीला होऊ शकतो विरोध ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर गेली पाच वर्षे माफ करण्यात आला होता. मात्र या सवलतीसाठी पालिकेला साडेतीनशे कोटींच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले होते. मात्र, वस्तू व सेवा कर लागू झाल्याने १ जुलैपासून जकात कर रद्द करण्यात आला आहे.यामुळे पालिकेला सात हजार कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागले आहे. यानंतर उत्पन्नाचे दुसरे मोठे स्रोत असलेल्या मालमत्ता करातही सवलत दिल्यास पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होईल, त्यामुळे प्रशासनाकडून या प्रस्तावाला नकारघंटा मिळण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेला मालमत्ता कराच्या माध्यमातून २०१६-१७ या आर्थिक वर्षात ४,८५० कोटी रुपये उत्पन्न मिळाले. तर २०१७-१८ या आर्थिक वर्षात ५,१०० कोटी रुपयांचे लक्ष्य आहे. मुंबईत एकूण २८ लाख रहिवासी घरे असून, त्यापैकी १५ लाख घरे ही ५०० चौरस फुटांपर्यंतची आहेत. या घरांना मालमत्ता कर माफ झाल्यास पालिकेचे ३४० कोटी रुपयांचे उत्पन्न बुडेल. ५०० ते ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांची संख्या सुमारे पावणेतीन लाख इतकी आहे. या घरांपासून पालिकेला २५० कोटींचा मालमत्ता कर मिळतो. या घरांच्या मालमत्ता करात ६० टक्के सवलत दिल्यास पालिकेला १५० कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागेल. शिवसेनेच्या या राजकीय निर्णयामुळे पालिकेला दरवर्षी पाचशे कोटी रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.