शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण उभारणार ५०० विद्युत वाहन चार्जिंग केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 03:16 IST

पुणे, मुंबई, नागपूरसह दहा केंद्रांचा समावेश

मुंबई : भविष्यात विद्युत वाहनांचा वाढता वापर लक्षात घेता, राज्यातील विविध ठिकाणी ५०० विद्युत वाहन चार्जिंग केंद्रे उभारण्याच्या प्रस्तावास तत्त्वत: मंजुरी मिळाली असून, ही केंद्र महावितरणकडून उभारली जातील.महावितरणतर्फे पहिल्या टप्प्यात ५० ठिकाणी हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने राबविला जाईल. यामध्ये मुंबई ४, ठाणे ६, नवी मुंबई ४, पनवेल ४, पुणे १०, मुंबई- पुणे महामार्ग १२, नागपूर १० केंद्रांचा समावेश आहे. यासाठीच्या निविदा अंतिम टप्प्यात असून, एका आठवड्यात कार्यादेश देण्यात येणार आहेत. नागपूर येथील अमरावती रोड उपकेंद्र आणि पुणे येथील पॅराडीगम उपकेंद्रात प्रत्येकी एक फास्ट डीसी चार्जिंग केंद्र उभारण्यात आले असून, ते लवकरच कार्यान्वित करण्यात येईल.रात्रीच्या वेळी दरात सवलतएका विद्युत वाहन चार्जिंग केंद्रासाठी महावितरणला २ लाख ५० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. विद्युत वाहन चार्जिंग केंद्र महावितरणच्या उपकेंद्रामध्ये उपलब्ध अतिरिक्त जागेत उभारण्यात येतील. ही केंद्र फास्ट डीसी चार्जिंग केंद्र असतील. एक वाहन पूर्ण चार्ज करण्यासाठी अंदाजे ४५ मिनिटे ते एक तास एवढा कालावधी लागेल. विद्युत वाहनचालकांना प्रतियुनिट ६ रुपये दर टीओडी तत्त्वावर चार्जिंगसाठी आकारण्यात येईल. रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत वीजदरात १ रुपया ५० पैसे सवलत देण्यात येईल. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणElectric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन