शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

आरक्षणासाठी असलेली ५०% मर्यादा वाढविणे गरजेचे, ॲड. रोहटगी यांनी मांडली मराठा आरक्षणाची बाजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 06:53 IST

 मंडल आयोगाच्या अहवालाच्या वेळी घेतलेल्या निर्णयावर चिकटून राहता येणार नाही. लोकसंख्या प्रचंड वाढली आहे, समाजात बदल झाले आहेत. त्यानुसार राखीव जागांच्या प्रमाणातही बदल होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले..

नवी दिल्ली : सध्या नोकऱ्या व रोजगारांमध्ये असलेली ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवून देणे आवश्यकच आहे, असे स्पष्ट प्रतिपादन करून ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहटगी यांनी सर्वोच्च न्यायालयातमराठा समाजासाठी ठेवण्यात आलेल्या राखीव जागांचे जोरदार समर्थन केले. मंडल आयोगाच्या शिफारशी अंमलात आणल्यानंतर इंद्रा साहनी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची कमाल मर्यादा ५० टक्के असावी, असा निकाल दिला होता. मात्र काही अपवादात्मक स्थितीत त्यात वाढ करता येईल, असेही नमूद केले होते. त्या निर्णयाचा पुनर्विचार करायला हवा, असा युक्तिवाद करताना ॲड रोहटगी शुक्रवारी म्हणाले की, प्रत्यक्ष मंडल आयोगानेही ३० वर्षांनंतर याचा विचार व्हावा, असे म्हटले होते. (50% limit for reservation needs to be increased, Adv. Rohatgi spoke in favor of Maratha reservation) इंद्रा साहनी प्रकरणात आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक असू नये, हा न्यायालयाचा निकालही एकमताचा नव्हता, आरक्षणाचे प्रमाण किती व कसे असावे, यावरून न्यायाधीशांमध्येच तीन मते होती, याचा उल्लंख करून रोहटगी म्हणाले की, आरक्षणाची कमाल मर्यादा किती असावी, याचा राज्यघटनेत कुठेही उल्लेख  नाही. त्यामुळे ते ५० टक्केच असावे, असा आग्रह धरता येणार नाही वा केवळ ५० टक्क्यांचेच समर्थन करता येणार नाही.  मंडल आयोगाच्या अहवालाच्या वेळी घेतलेल्या निर्णयावर चिकटून राहता येणार नाही. लोकसंख्या प्रचंड वाढली आहे, समाजात बदल झाले आहेत. त्यानुसार राखीव जागांच्या प्रमाणातही बदल होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले..

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांत ओबीसींसाठी असलेले २७% जागांचे आरक्षण रद्द करण्याच्या आपल्याच निर्णयाचा सर्वोच्च न्यायालय फेरविचार करणार आहे. त्यावरील सुनावणी सोमवारी होण्याची शक्यता आहे. 

ओबीसी आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाचा सुप्रीम कोर्टात फेरविचार! पुनर्विचार याचिकांवर शुक्रवारी न्या. अजय खानविलकर यांच्यापुढे या विषयावर  प्रदीर्घ युक्तिवाद झाल्यानंतर ४ मार्चच्या आपल्या निर्णयाचा फटका ज्यांना बसला आहे, त्यांच्या प्रतिनिधींना सुनावणीत सहभागी करून घेण्याची तयारी दर्शवली. 

न्यायालयाने आमचे म्हणणे ऐकून न घेताच ४ मार्च रोजी आमच्या निवडी रद्द करून टाकल्या, हे न्यायाला धरून नाही, अशी या याचिकाकर्त्यांची तक्रार आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयState Governmentराज्य सरकार