शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील मतमोजणी पुढे ढकलणारी याचिका कोणी केली होती? वर्ध्यात सगळा घोळ झाला, या पक्षाच्या उमेदवाराने....
2
कर्नाटकच्या राज्यपालांच्या नातसुनेचा गंभीर आरोप! पतीकडून ५० लाख हुंड्यासाठी छळ, टेरेसवरून धक्का दिला
3
पत्रकाराने प्रश्न विचारला,रेणुका चौधरी यांनी भौ-भौ करत दिले उत्तर; व्हिडीओ व्हायरल
4
विराट कोहली १६ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार; प्रत्येक सामन्यासाठी 'इतकी' मॅच फी मिळणार
5
अफगाणिस्तानात तालिबानची क्रूर शिक्षा: ८० हजार लोकांसमोर १३ वर्षांच्या मुलाने आरोपीला गोळ्या घातल्या...
6
'केंद्र सरकारने सत्य उघडले'; महाराष्ट्र शासनाने कर्जमाफीचा प्रस्तावच पाठवला नाही; सुप्रिया सुळेंची टीका
7
तपोवन वृक्षतोडी विरोधातील आंदोलनाला अजित पवारांचा पाठिंबा; म्हणाले, झाडं वाचली तरच पुढची पिढी..."
8
USD to INR: का होतेय भारतीय रुपयामध्ये घसरण? आशियातील सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या चलनांमध्ये सामिल
9
डोळ्याला मोठा भिंगाचा चष्मा आणि पुढे आलेले दात; जस्सीचा बदलला लूक, आता ओळखताही येत नाही
10
IND vs SA 2nd ODI Live Streaming: टीम इंडियानं सलग २० व्या वनडेत गमावला टॉस! मॅचसह मालिका जिंकणार?
11
देशात घुसखोरांच्या स्वागतासाठी लाल गालीचा अंथरणे योग्य आहे का?, सुप्रीम  कोर्टाने विचारला सवाल
12
वृक्षतोडीचं राजकारण करणाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडून 'शाळा'; म्हणाले, झाडं जपायलाच हवीत, पण कुंभमेळ्याची संस्कृतीही...
13
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: तीन वर्षांपासून आमचे संबंध नाही; अनंत गर्जेच्या प्रेयसीने पोलिसांना काय सांगितले?
14
'ही काही फॅक्टरी नाहीये...', दीपिका पादुकोणच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर राणा दग्गुबती स्पष्ट मत
15
आता १९ नव्हे, 'या' ३० देशांच्या लोकांना अमेरिकेत 'नो एन्ट्री'! डोनाल्ड ट्रम्प कायदे आणखी कठोर करणार
16
Tatkal Ticket: ...तर आरक्षण खिडकीवरून तत्काळ तिकीट मिळणार नाही; नवा नियम लवकरच लागू!
17
Dollar Vs Rupee: अरे बाप रे... १ डॉलर = ₹ ९०.१३ ! भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण; तुमच्या खिशावर कसा होईल परिणाम?
18
भारत भेटीपूर्वी पुतिन यांचे मोठे पाऊल; रशियाने भारतासोबत लष्करी कराराला दिली मान्यता
19
६० व्या वर्षी ₹५००० चं पक्कं पेन्शन, पात्रतेसोबत जाणून घ्या अर्ज करायची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
20
School Holiday: तामिळनाडूत शाळा बंद, जम्मू काश्मीरसह MP, UP मध्येही शाळांना दिर्घ काळ सुट्टी घोषित, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 05:57 IST

महसूलमंत्री बावनकुळे; १ जानेवारी २०२५ पर्यंत झालेल्या व्यवहारांचे नियमितीकरण केले जाणार

मुंबई - जमिनीचे व्यवहार झाले, पैशांची देवाणघेवाणही झाली; पण सातबाऱ्यावर नोंद होऊ शकली नाही, ती तुकडाबंदी कायद्यामुळे. आता हा कायदा शिथिल करून अशा सर्व जमिनींच्या १ जानेवारी २०२५ पर्यंत झालेल्या व्यवहारांचे नियमितीकरण केले जाईल. त्यामुळे जमिनीच्या कायदेशीर मालकीपासून वंचित असलेल्या ५० लाख नागरिकांना मालकी मिळू शकेल. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत याबाबतची घोषणा बुधवारी केली.

शिंदेसेनेचे संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत तुकडेबंदी कायद्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. राज्यात अनेक भागांमध्ये तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन झाले असून, नागरिकांच्या मालमत्तांवर नोंदणीसह अन्य कायदेशीर प्रक्रियांना अडथळे निर्माण झाले आहेत. याकडे खताळ यांनी लक्ष वेधले. त्यावर बावनकुळे यांनी केलेल्या घोषणेचे प्रकाश सोळंके, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार आणि अन्य सत्तारूढ व विरोधी पक्ष सदस्यांनीही स्वागत केले.

पुढे काय हाेणार?हा कायदा शिथिल करण्याबाबची कार्यपद्धती १५ दिवसांत जाहीर हाेईल. भविष्यात हा कायदा कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी योग्य कार्यपद्धती (एसओपी) ठरविली जाईल. त्यासाठी चार अधिकाऱ्यांची समिती नेमणार. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, प्राधिकरण क्षेत्रे, तसेच गावठाणालगत २०० ते ५०० मीटरपर्यंतचा भाग या क्षेत्रालाही आजच्या निर्णयाचा फायदा होईल. महापालिकांच्या सीमेलगत दोन किलोमीटरपर्यंतचा भागदेखील एसओपीमध्ये विचारात घेतला जाईल.

काय आहे कायदा...शेतजमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम म्हणजेच तुकडेबंदी कायदा. किती आकारापेक्षा कमी शेतजमीन तुम्हाला विकता वा खरेदी करताच येणार नाही, याची तरतूद या कायद्यामध्ये आहे. त्याला प्रमाणभूत क्षेत्र म्हणतात. शेती परवडणारी व्हावी यासाठी हा कायदा केला गेला. सरकारने पूर्वी या कायद्यांतर्गत एक एकर इतके प्रमाणभूत क्षेत्र निश्चित केले होते. २०२३ मध्ये जिरायतीसाठी २० गुंठे, तर बागायतीसाठी १० गुंठे इतके प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आले. यापेक्षा कमी जमीन खरेदी-विक्री करता येणार नाही, अशी ही तरतूद आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमिनींची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात करून कायदा धाब्यावर बसविला गेला. विश्वासावर किंवा नोटरी करून किंवा साठेखत करून, असे व्यवहार झाले. मात्र, त्यामुळे ज्याने जमीन खरेदी केली आहे त्याच्या सातबाऱ्यावर जमिनीची नोंद झाली नाही. आता ती शक्य होणार आहे.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे