भ्रष्टाचाराची ५० प्रकरणे प्रलंबित

By Admin | Updated: October 6, 2014 00:58 IST2014-10-06T00:58:59+5:302014-10-06T00:58:59+5:30

गेल्या साडेपाच वर्षांच्या कालावधीत शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या ७०८ तक्रारी करण्यात आला. विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीसमोर प्राप्त झालेल्या या तक्रारींपैकी ५० प्रकरणे

50 cases of corruption are pending | भ्रष्टाचाराची ५० प्रकरणे प्रलंबित

भ्रष्टाचाराची ५० प्रकरणे प्रलंबित

शासकीय कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचार : ५ वर्षात ७०८ तक्रारी प्राप्त
नागपूर : गेल्या साडेपाच वर्षांच्या कालावधीत शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या ७०८ तक्रारी करण्यात आला. विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीसमोर प्राप्त झालेल्या या तक्रारींपैकी ५० प्रकरणे अद्यापही प्रलंबित आहेत. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंदर्भात प्रशासनाकडे विचारणा केली होती. नागपूर विभागीय आयुक्तांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराबाबत १ जानेवारी २००९ ते ३० जून २०१४ पर्यंत भ्रष्टाचार निर्मूलन समितीसमोर किती प्रकरणे आली व त्यावर काय कारवाई झाली याबाबत माहिती मागविण्यात आली होती. यासंदर्भात विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार या कालावधीत ७०८ तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी २२ तक्रारी समितीच्या कार्यकक्षेत येत नसल्याने संबंधित विभागास पाठवून त्या स्तरावर नस्तीबद्ध करण्यात आल्या. उर्वरित ४८६ प्रकरणांत संबंधित विभागाकडून अहवाल मागविण्यात आले होते. त्यानुसार अहवाल प्राप्त झालेल्या ४५४ प्रकरणांत अंतिम कार्यवाही करण्यात आलेली आहे. परंतु ५० प्रकरणे अद्यापही प्रलंबित आहेत. यात जुनी ४७ तर नवीन ३ प्रकरणांचा समावेश आहे. यासंदर्भात २४ जुलै रोजी भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रलंबित तक्रारींमध्ये संबंधित विभागाकडून तत्काळ अहवाल मागविण्याचे निर्देश देण्यात आले होते अशी माहिती समितीतर्फे नमूद करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)

Web Title: 50 cases of corruption are pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.