Electoral Bonds: Beef निर्यातदार कंपनीकडून शिवसेनेला ५ कोटी अन् भाजपाला २ कोटी; बसला ना धक्का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 04:59 PM2024-03-22T16:59:23+5:302024-03-22T17:47:55+5:30

Supreme Court on Electoral Bonds: सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राजकीय पक्ष आणि त्यांना देणगी देणाऱ्या कंपनीच्या नावांचा खुलासा निवडणूक आयोगाने सार्वजनिक केला आहे.

5 Crore Electoral Bond to Shiv Sena and 2 Crore to BJP from Beef Exporter Company | Electoral Bonds: Beef निर्यातदार कंपनीकडून शिवसेनेला ५ कोटी अन् भाजपाला २ कोटी; बसला ना धक्का?

Electoral Bonds: Beef निर्यातदार कंपनीकडून शिवसेनेला ५ कोटी अन् भाजपाला २ कोटी; बसला ना धक्का?

मुंबई - सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगानं इलेक्टोरल बॉन्डच्या नंबरसह राजकीय पक्ष आणि त्यांना देणगी देणाऱ्या कंपन्यांची नावे सार्वजनिक केली आहेत. या देणगीदार कंपन्यांमध्ये एक नाव अल्लाना ग्रुप विशेष आहे. कारण हलाल बोनलेस बफेलो मीट विक्री करणारे सर्वात मोठे उत्पादक आणि निर्यातदार असलेल्या अल्लाना ग्रुप निगडीत कंपन्यांनी २०१९ मध्ये ६ आणि २०२० मध्ये १ बॉन्ड खरेदी केला. ज्यात शिवसेना, भाजपा या राजकीय पक्षांना फायदा झाला. 

Allana कोल्ड स्टोरेजनं ७६५१ नंबरचा बॉन्ड जुलै २०१९ मध्ये खरेदी केला होता. त्याची किंमत १ कोटी इतकी होती. या नंबरचा बॉन्ड शिवसेनेला ११ जुलै २०१९ रोजी दिला. त्यानंतर Allana Sons प्रायव्हेट लिमिटेडने ७६५५ नंबरचा बॉन्ड ९ जुलै २०१९ रोजी खरेदी केला. त्याची किंमतही १ कोटी होती. हा बॉन्डही शिवसेनेला देण्यात आला. अशाप्रकारे अल्लाना ग्रुपच्या विविध कंपन्यांनी ५ कोटी रुपयांचा बॉन्ड ११ जुलै २०१९ रोजी शिवसेनेला दिला. तसेच Frigerio Conserva AL ने ७७७२ नंबरचा बॉन्ड २२ जानेवारी २०२० रोजी खरेदी केला होता. त्याची किंमत १ कोटी होती. त्याचसोबत Allana Sons कडूनही १ कोटींचा बॉन्ड ३ फेब्रुवारीला भाजपाला देण्यात आला. 

कन्स्ट्रशन कंपनीकडून शिवसेनेला सर्वाधिक बॉन्ड

शिवसेनेला सर्वाधिक देणगी देणारी बी. जी. शिर्के कंस्ट्रक्शन्स टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीने शिवसेनेला ८५ कोटी आणि २०२३-२४ दरम्यान भाजपाला ३० कोटी रुपये दिले आहेत. गेल्या वर्षी बी. जी. शिर्के कंस्ट्रक्शन्सला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यामध्ये २०४४८ फ्लॅट्सचं ४६५२ कोटींचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. 

Web Title: 5 Crore Electoral Bond to Shiv Sena and 2 Crore to BJP from Beef Exporter Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.