आयुक्तालयांतर्गत ४८ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
By Admin | Updated: June 10, 2016 05:23 IST2016-06-10T05:23:04+5:302016-06-10T05:23:04+5:30
२५ वरिष्ठ निरीक्षक व २३ सहाय्यक आयुक्तांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या आहेत.

आयुक्तालयांतर्गत ४८ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या २५ वरिष्ठ निरीक्षक व २३ सहाय्यक आयुक्तांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या आहेत. आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अस्थापना बैठकीनंतर बदल्यांचे आदेश गुरुवारी जारी करण्यात आले.
या अधिकाऱ्यांशिवाय सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक आणि अंमलदारांच्या बदल्या अद्याप प्रलंबित आहेत. त्यांना कधी ‘मुहूर्त’ मिळतो याकडे पोलीस वर्तुळाचे लक्ष लागले आहे. एकाच ठिकाणी दोन किंवा त्यापेक्षा अधिक वर्षे काढणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली केली जाते. मात्र गेल्यावर्षी सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे ‘साईड ब्रॅन्च’ला कालावधी पूर्ण होऊनही त्यांना त्याठिकाणी खितपत रहावे लागले तर मोक्याच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची ‘चंगळ’ झाली होती. आयुक्त पडसलगीकर यांनी याकडे विशेष लक्ष देऊन संबंधितांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी केली जात आहे.
सहाय्यक निरीक्षक : अरविंद सावंत (सीबी ), सुनील देशमुख (सीबी- दादर), नंदकिशोर मोरे (सीबी), भीमा राठोड (चेंबूर-घाटकोपर), दीपक कटकडे (दादर-माटुंगा), रमेश खाकले (आर्थिक गुन्हा शाखा-आर्थिक गुन्हा शाखा), विजय मोकाने (मुख्यालय- समन्वयक -यलो गेट), श्रीरंग नाडगौडा ( कुर्ला-मालवणी), सुधीर रणशेवरे (संरक्षण व सुरक्षा- वाहतूक), प्रदीप गोसावी (संरक्षण व सुरक्षा- वाहतूक), गणेश रेकुळवाड (वाहतूक-वाहतूक), नरेंद्र विचारे (हत्यार-वडाळा), शंकर काळे (हत्यार- हत्यार विभाग), राजदुत रुपवते (सीबी-सीबी), प्रफुल्ल भोसले (सीबी-सीबी), सुरेशकुमार पाटील (विशेष शाखा-१-विशेष शाखा१), धनराज गायकवाड (दक्षिण नियंत्रण कक्ष-चेंबूर), ज्ञानेश्वर जवळकर (पश्चिम नियंत्रण कक्ष - दिंडोशी), नागेश जाधव (मध्य नियंत्रण कक्ष- ताडदेव), अजय पाटणकर (ट्रॉँम्बे- आग्रीपाडा), दिनेश देसाई ( विशेष शाखा- संरक्षण व सुरक्षा ) व सुनील शेजवळ (मुख्यालय- विमानतळ) (प्रतिनिधी)
>बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे ( कंसात नियुक्तीचे ठिकाण)
वरिष्ठ निरीक्षक : विलास चव्हाण (आरे-संरक्षण व सुरक्षा) रमेश खडतरे (अंबोली-संरक्षण व सुरक्षा), कुंडलिक निगडे (बीकेसी), गोपिका जहागिरदार (सीबी), विनायक वस्त (सीबी-सीबी), सुनील भोईटे (आर्थिक गुन्हे शाखा), दिलीप शिंदे (हत्यार विभाग), दत्ताराम सावंत (हत्यार विभाग), शिरीष देसाई (नियंत्रण कक्ष- वाहतुक), विजय ओलकर (संरक्षण व सुरक्षा- आरे), भाऊराव बागूल (संरक्षण व सुरक्षा), प्रकाश एकबोटे (संरक्षण व सुरक्षा- आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखा)
सुनील सुहानी (संरक्षण व सुरक्षा), दिलीप राऊत (आरसीएफ), सुनील दिवोधारकर (एसबी-१), संजय काळे (एसबी-१-वाहतुक), सुनील कुलकर्णी (वाहतुक), सुनीता नाशिककर (वाहतुक), सुधाकर शिंदे (पश्चिम नियंत्रण कक्ष), विलास चव्हाण (संरक्षण व सुरक्षा), अशोक दाभाडे (वाहतुक), गोविंद परमार (वाहतुक), सतीश पाटील (वाहतुक) भारत गायकवाड (हत्यार विभाग-अंबोली), श्रीरंग मयेकर (विमानतळ-हत्यार विभाग)