शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

४८ तास कडाक्याच्या थंडीचे!

By admin | Updated: December 30, 2014 01:01 IST

शनिवार, रविवार उपराजधानीला अक्षरश: हुडहुडी आणणाऱ्या पाऱ्याने सोमवारी किमान तापमानाचे सर्व ‘रेकॉर्ड’ मोडीत काढले. सरासरीहून चक्क ७ अंश कमी तापमान अनुभवलेल्या नागपूरसाठी पु

उपराजधानीला हुडहुडी : तापमान ५ अंशाहून खाली जाण्याची शक्यतानागपूर : शनिवार, रविवार उपराजधानीला अक्षरश: हुडहुडी आणणाऱ्या पाऱ्याने सोमवारी किमान तापमानाचे सर्व ‘रेकॉर्ड’ मोडीत काढले. सरासरीहून चक्क ७ अंश कमी तापमान अनुभवलेल्या नागपूरसाठी पुढील ४८ तासदेखील गारठवणारेच राहणार आहेत. येत्या दोन दिवसांत किमान तापमान याहून खालच्या पातळीवर जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे. ४८ वर्षांपूर्वी पडलेल्या कडाक्याच्या थंडीसारखाच अनुभव नागपूरकरांना येत असून केवळ मनुष्यच नाही तर प्राण्यांवरदेखील याचा परिणाम होत आहे. केवळ शहरातील नागरिकच नव्हे तर पाळीव प्राणीदेखील उबदार कपड्यांमध्ये दिसून आले. रविवारी शहरात ६.१ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. सोमवारी ६ अंशांच्या आसपास तापमान असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. परंतु उत्तर भारतातील अनेक शहरांत पारा घसरला अन् नागपुरातदेखील त्याचा परिणाम दिसून आला. सोमवारी पहाटे ५.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. ईशान्य मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये थंडीची लाट असून बंगालच्या उपसागरातदेखील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या सर्वांचा परिणाम विदर्भावर होत आहे. वातावरणात शुष्कता असल्याने पाऱ्यात घसरण कायम राहून शीतलहर कायम राहील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (प्रतिनिधी)ड्रायस्किन व दम्याचे रुग्ण वाढले एकीकडे कडाक्याच्या थंडीने नागपूरकरांना त्रस्त केले असतानाच यातून स्किनच्या विविध आजाराचासुद्धा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे शहरातील नागरिकांमध्ये ड्रायस्किनचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्वचा कोरडी पडल्याने खाजेचा त्रास वाढला आहे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक प्रभावित होत आहेत. शासकीय रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांमध्ये सध्या ड्रायस्किन व दम्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत. उपराजधानीवर धुक्याचे पांघरुणपहाटेपासूनच उपराजधानीत कडाक्याची थंडी होती. शहरात सकाळच्या सुमारास धुक्याचे पांघरुणच पडले होते. विशेषत: पश्चिम नागपूर, सिव्हिल लाईन्स, तेलंगखेडी या परिसरात याची तीव्रता जास्त होती. अनेक रस्त्यांवर समोरून येणारे वाहनपण नीटपणे दिसत नव्हते अशी स्थिती होती.दुपारीही कानटोप्या अन् मफलरहिवाळ्यात एरवी सकाळी व सायंकाळनंतर नागरिक शाल, स्वेटर्स, मफलर अन् टोप्या घालून घराबाहेर निघतात. परंतु सोमवारचा दिवस याला अपवाद ठरला. भर दुपारीदेखील अनेक जण कानटोप्या अन् मफलर घातलेले दिसून आले. बहुतांश दुचाकीस्वारांनी तर कान व चेहरा झाकलेलेच होते.