४८ तासात पारा ४८ अंशावर?

By Admin | Updated: May 25, 2014 00:59 IST2014-05-25T00:59:35+5:302014-05-25T00:59:35+5:30

नवतपा सुरू होण्याच्या एक दिवस आधीच विदर्भ उन्हामुळे होरपळायला लागला आहे. नागपुरात पारा ४५ अंशावर पोहोचला. तापमानाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता येत्या ४८

48 hours in 48 hours on mercury? | ४८ तासात पारा ४८ अंशावर?

४८ तासात पारा ४८ अंशावर?

नागपूर: नवतपा सुरू होण्याच्या एक दिवस आधीच विदर्भ उन्हामुळे होरपळायला लागला आहे. नागपुरात पारा ४५ अंशावर पोहोचला. तापमानाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता येत्या ४८ तासात पारा ४८ अंशावर जाण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसात नागपूरचे तापमान २ अंशाने वाढले आहे. विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर (४६ अंश.से.) येथे नोंदवण्यात आले.

२५ मेपासून नवतपा सुरू होणार आहे. या काळात उन्हाची तीव्रता अधिक राहते. तापमान उच्चांकावर असते. यंदा नवतपामध्ये होरपळून टाकणारे ऊन पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचा प्रत्यय शनिवारी आला. उन्हाच्या तडाख्याचा सामान्य जन जीवनावरही परिणाम झाल्याचे दिसून आले. दरम्यान एकीकडे ऊन वाढत असताना दुसरीकडे ढगाळ वातावरणाची शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे. बंगालच्या उपसागरात मान्सून पुढे सरकत आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे मध्य भारतात अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासात पारा ४५ अंशावर, तसेच पुढील ४८ तासात पारा ४८ अंशावर जाण्याची शक्यता आहे. हा अंदाज खरा ठरला तर नागपुरात या दशकातील सर्वाधिक तापमानाची नोंद होईल. (प्रतिनिधी)

Web Title: 48 hours in 48 hours on mercury?