शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

राज्यातील ४६ पोलिसांना ‘राष्ट्रपती’ पदक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 7:09 AM

स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाद्वारे देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली असून, महाराष्ट्रातील ४६ पोलिसांना या पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.

मुंबई : स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाद्वारे देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली असून, महाराष्ट्रातील ४६ पोलिसांना या पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.राज्य पोलीस दलामध्ये उत्कृष्ट सेवेकरिता मुंबईतील साकिनाका विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद भिकाजी खेतले, पुणे पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र शिवाजी जाधव, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक राजाराम रामराव पाटील, पुण्यातील राज्य राखीव पोलीस दल गट-२ चे हरिश्चंद्र गोपाळ काळे, कोल्हापूरचे जिल्हा विशेष शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक मारुती कलप्पा सूर्यवंशी यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. प्रशंसनीय सेवेकरिता राज्य दहशतवाद विभागाचे मुंबईतील पोलीस उपायुक्त विक्रम नंदकुमार देशमाने, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस उपायुक्त नेताजी शेकुंबर भोपळे, आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त किरण पाटील, डोंगरी विभागाचे सहायक आयुक्त अविनाश धर्माधिकारी, साकिनाका पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक अब्दुल शेख, पायधुनी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक प्रकाश कदम, गुन्हे शाखेतील हवालदार गणेश गोरेगावकर आणि लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यातील हवालदार श्रीरंग सावरडे यांचा समावेश आहे.पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र लक्ष्मणराव कदम, चिखली पोलीस ठाण्याचे निरीक्षक बालाजी रघुनाथ सोनटक्के, विशेष शाखेचे सहायक उपनिरीक्षक मनोहर लक्ष्मण चिंतलु, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक राजेंद्र नारायण पोळ, गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक निरीक्षक रवींद्र गणपत बाबर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक दिलीप पोपटराव बोरसटे, चिंचवड वाहतूक विभागाचे उपनिरीक्षक किशोर अमृत यादव, विशेष शाखेचे सहायक उपनिरीक्षक अविनाश सुधीर मराठेसह पुणे ग्रामीण येथील वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल बालू मच्छिंद्र भोई, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक उपनिरीक्षक दत्तात्रय गोरखनाथ जगताप यांना प्रशंसनीय सेवेकरिता पदक देवून सन्मानित करण्यात येणार आहे.पेठबीड पोलीस ठाण्याचेनिरीक्षक सय्यद शौकतअली साबीरअली, नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश दिगंबर गायकवाड, तसेच ठाण्यातील नागरी हक्क संरक्षण विभागातील अधिक्षक सुरेशकुमार सावलेराम मेंगडे, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त मुकुंद नामदेव हातोटे, महासंचालक कार्यालयातील उपअधिक्षक गोपिका शेषदास जहागिरदार, पालघरचे उप अधिक्षक मंदार वसंत धर्माधिकारी, नागपूर पोलीस प्रशिक्षण केंद्रातील राखीव उपनिरीक्षक रमेश दौलतराव खंडागळे, गुन्हे शाखेचे सहायक उपनिरीक्षक अशोक सोमाजी तिडके, तहसील पोलीस ठाणे सहायक उपनिरीक्षक विश्वास शामराव ठाकरे, वाहतूक शाखेचे सहायक उपनिरीक्षक नितीन रामराव शिवलकर, सोलापूर राज्य राखीव पोलीस दल गट -१० उपनिरीक्षक नानासाहेब विठ्ठल मसाळ, नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालय उपनिरीक्षक रघुनाथ मंगलु भरसट, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक उपनिरीक्षक दत्तात्रय तुकाराम उगलमुगले, अमरावती पोलीस मुख्यालय सहायक उपनिरीक्षक केशव शेषराव टेकाडे आणि पी.सी.आरचे सहायक उपनिरीक्षक कचरु नामदेव चव्हाण, जालना पोलीस मुख्यालयातील सहायक उपनिरीक्षक रामराव दासु राठोड, यवतमाळ पोलीस मुख्यालयातील सहायक उपनिरीक्षक सुनील गणपतराव हरणखेडे, औरंगाबाद विशेष शाखेतील सहायक उपनिरीक्षक गोरख मानसिंग चव्हाण, नांदेड मांडवी पोलीस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक खामराव रामराव वानखेडे, जालना येथील दहशतवाद विरोधी कक्षातील हेड कॉन्स्टेबल अंकुश सोमा राठोड, नांदेड पोलीस मुख्यालयातील हेड कॉन्स्टेबल अविनाश गोविंदराव सातपुते आणि परभणीतील पूर्णा पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल मकसूद अहेमदखान पठाण या सर्वांना प्रशंसनीय सेवेकरिता पदक जाहीर झाले आहे. 

टॅग्स :Policeपोलिस