शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

CoronaVirus News: ठाकरे सरकारनं कोरोना संकट योग्यपणे हाताळलं का?; राज्यातील जनता म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 20:52 IST

CoronaVirus News: कोरोना संकटात कशी होती ठाकरे सरकारची कामगिरी?; जाणून घ्या राज्यातील जनतेचा कौल

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या सातत्यानं वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वर्षभरापूर्वी देशात लॉकडाऊन करण्यात आला. आता कोरोनाची दुसरी लाट आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यानं अनेक ठिकाणी निर्बंध लादले गेले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच कोरोना संकट आलं. या कालावधीत सरकारचं काम कसं झालं, सरकारची कामगिरी नागरिकांना कशी वाटली, याबद्दलची एक आकडेवारी समोर आली आहे.भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा १०० दिवसांपर्यंत प्रभाव जाणवणार, तब्बल २५ लाख नवे रुग्ण सापडणार कोरोना काळात ठाकरे सरकारनं परिस्थिती योग्य रितीनं हाताळली का, असा प्रश्न जनतेला विचारण्यात आला. त्यावर ४४ टक्के लोकांनी होय, तर ३६ टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलं. तर २० टक्के लोकांनी सांगता येत नाही, असं उत्तर दिलं. लॉकडाऊनमुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं का, या प्रश्नाला होय असं उत्तर देणाऱ्यांचं प्रमाण ४८ टक्के, तर नाही असं उत्तर देणाऱ्यांचं प्रमाण ३१ टक्के इतकं आहे. सांगता येत नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण २१ टक्के आहे. एबीपी माझानं याबद्दलचं सर्वेक्षण केलं आहे....तर पुढील २ आठवड्यांत कोरोनामुळे रोज १ हजार जणांचा बळी; महाराष्ट्रासाठी धोक्याचा इशारामहाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. गेल्या वर्षी कोरोना रुग्ण वाढीनं नोंदवलेला उच्चांक आता मोडीत निघाला आहे. कोरोनाची ही दुसरी लाट नेमकी कशामुळे आली, असा प्रश्न जनतेला विचारण्यात आला. चुकीच्या हाताळणीमुळे कोरोनाची लाट आल्याचं ३६ टक्के लोकांना वाटतं. तर जास्तीच्या चाचण्यांमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचं २९ टक्के लोकांना वाटतं. तर ३५ टक्के लोकांनी सांगता येत नसल्याचं म्हटलं.

कोरोना काळात सामान्य जनता जबाबदारीनं वागली का?होय- ४९ टक्केनाही- ३५ टक्केसांगता येत नाही- १६ टक्के

४५ वर्षांवरील प्रत्येकाला लस दिल्यास दुसरी लाट ओसरेल का?होय- ४६नाही- २६सांगता येत नाही- २८ टकके 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस