शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली, काेल्हापूरच्या पुरात 40 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 21:24 IST

सांगली आणि काेल्हापूरमध्ये आलेल्या पूरामध्ये तब्बल 40 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

पुणे : सांगली व कोल्हापूरमधील महापुर तसेच इतर भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे विभागात एकुण ४० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १९ जण सांगली जिल्ह्यातील आहेत. ब्राम्हनाळमधील बेपत्ता सहा जणांपैकी पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर एक व्यक्ती सुखरुप असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली. 

सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील ब्राम्हनाळ येथे बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत एकुण १७ जणांचा मृत्यू झाला. शनिवारपर्यंत सहा जण बेपत्ता होते. त्यापैकी पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत. एकुण मृतांमध्ये १२ महिला व चार लहान मुलांचा समावेश आहे. आमसिध्द नरूरे हे सुखरुप असल्याचे स्थानिक भागात चौकशी केल्यानंतर स्पष्ट झाले आहे. सांगली जिल्ह्यातील मृतांचा एकुण आकडा १९ वर पोहचला आहे. तर एक व्यक्ती अद्यापही बेपत्ता आहे. कोल्हापुर जिल्ह्यामध्ये ६ आणि सातारा व पुणे जिल्ह्यात प्रत्येकी ७ जणांचा मृत्यु झाला आहे. तर सोलापुरमध्ये एका व्यक्तीला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पुणे विभागातील मृतांचा एकुण आकडा ४० वर गेला असून तीन जण बेपत्ता आहेत.

कोल्हापुर जिल्ह्यातून आतापर्यंत २ लाख ४५ हजार २२९ जणांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यांच्यासाठी १८८ निवारा केंद्र उभारण्यात आली आहेत. सांगलीमधील १ लाख ५८ हजार ९७० जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. त्यांच्यासाठीस ११७ ठिकाणी निवारा करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील १० हजार ४८६ तर सोलापूर जिल्ह्यातील २७ हजार जणांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. पुणे विभागातील स्थलांतरीतांची संख्या तब्बल ४ लाख ४१ हजार ८४५ एवढी आहे.

ब्रम्हनाळ दुर्घटनेतील मृतांची नावे (कंसात वय) गंगुबाई भिमा सलगर (६०), बाबूराव आण्णा पाटील (६५), वर्षा भाऊसो पाटील (४०), लक्ष्मी जयपाल वडेर (६५), कस्तुरी जयपाल वडेर (३५), राजमती जयपाल चौगुले (वय ६२), कल्पना रविंद्र कारंडे (३५), सुवर्णा उर्फ नंदा तानाजी गडदे (वय ३५), राजवीर आप्पासो घटनटटी (४ महिने), सोनाली आप्पासो घटनटटी (४), सुरेखा मधुकर नरूटे (४५), रेखा शंकर वावरे (४०), सौरव तानाजी गडदे (८), सुनिता संजय रोगे, कोमल मधुकर नरूटे (२१), मनिषा दिपक पाटील (३१), क्षिती दिपक पाटील (४).

 

 

टॅग्स :Deathमृत्यूKolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूरRainपाऊस