सात महिन्यांत ३८ बलात्कार

By Admin | Updated: May 7, 2014 00:18 IST2014-05-07T00:17:58+5:302014-05-07T00:18:22+5:30

औरंगाबाद : कठोर कायदे होऊनही महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात घट होत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात मागील सात महिन्यांत तब्बल ३८ महिलांना बलात्कारासारख्या अत्याचाराला सामोरे जावे लागले आहे.

38 rape in seven months | सात महिन्यांत ३८ बलात्कार

सात महिन्यांत ३८ बलात्कार

औरंगाबाद : कठोर कायदे होऊनही महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात घट होत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात मागील सात महिन्यांत तब्बल ३८ महिलांना बलात्कारासारख्या अत्याचाराला सामोरे जावे लागले आहे. शासनाने मनोधैर्य योजनेंतर्गत आतापर्यंत वरीलपैकी ३० महिलांना आर्थिक मदत दिली आहे. महाराष्ट्र सरकारने बलात्कारपीडित महिला आणि मुलांच्या पुनर्वसनासाठी मनोधैर्य योजना सुरू केलेली आहे. या योजनेंतर्गत बलात्कारपीडित महिलांना तसेच लैंगिक शोषण झालेल्या मुलांना २ ते ३ लाख रुपयांची आर्थिक स्वरूपाची मदत केली जाते. त्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली गुन्हेगार क्षतीसाहाय्य व पुनर्वसन मंडळ स्थापन करण्यात आलेले आहे. या मंडळात पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी हे सदस्य असतात, तर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी या मंडळाचे सदस्य सचिव आहेत. या मंडळाची बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्ह्यात २ आॅक्टोबर २०१३ ते ५ मे २०१४ या काळात बलात्काराच्या तब्बल ३८ घटना घडल्या आहेत. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्व प्रकरणांच्या एफआयआरची प्रत संबंधित पोलीस ठाण्यांच्या तपास अधिकार्‍यांकडून जिल्हाधिकारी कार्यालय आणि महिला व बालविकास विभागाला प्राप्त झाली. त्यानंतर तपास अधिकार्‍यांचा सविस्तर अहवाल मागवून ३० प्रकरणांमध्ये शासनाची मदत पीडित महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली.

Web Title: 38 rape in seven months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.