शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघातात ३७ टक्के घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 01:38 IST

लॉकडाऊनने मोठी भूमिका बजावली

मुंबई : गेल्या वर्षीच्या आकडेवारीच्या तुलनेत वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यांत राज्यभरात झालेल्या जीवघेण्या अपघातांमध्ये संख्या ३७ टक्के घट झाली आहे.जीवघेण्या अपघातांची संख्या कमी करण्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनने मोठी भूमिका बजावली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले, परंतु राज्यभरात ही आकडेवारी समान नव्हती. कारण किमान पाच जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन असूनही अपघातांच्या संख्येत किंचित वाढ झाली. जालना, वाशिम, धुळे, अमरावती (ग्रामीण) आणि जळगावसारख्या जिल्ह्यांमध्ये यंदा जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत रस्ते अपघात आणि मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढली होती. अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले की, राज्यभरात झालेल्या जीवघेण्या अपघातांमध्ये सरासरी किमान २० टक्के घट झाली. महाराष्ट्रात अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जुलैनंतरच संख्येचा वाढता ट्रेंड दिसून आला. प्रवासावर निर्बंध असल्याने आणि गाड्या कमीत कमी पद्धतीने कार्यरत असल्याने अनेकांनी सुरक्षिततेसाठी रस्त्यावरून खासगी वाहनाने प्रवास करणे पसंत केले.वाहतूक विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत ३३६ अपघातांमध्ये ३५८ हून अधिक मृत्यू झाले होते, तर चालू वर्षाच्या आकडेवारीनुसार २१२ प्राणघातक अपघातांमध्ये २२३ जणांचा मृत्यू झाला होता. या आकडेवारीवरून असे दिसून येते की, जीवघेण्या रस्ते अपघातांमध्ये ३६.९ टक्के घट झाली.एका अधिकाऱ्याने सांगितले की, यंदा अपघातांची संख्या कमी झाली असली, तरी बहुतांश अपघात जीवघेणे होते. रस्ता समजून घेण्यासाठी आणि किमान रस्ते अपघात होऊ नयेत, म्हणून वाहतूक पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत आणि ब्लॅक स्पॉट आधीच शोधून काढला आहे. त्यानंतर, पोलीस अधिकाऱ्यांनी स्वयंसेवी संस्थांशी करार केला आहे, जे वाहनचालकाला शिक्षण देतील आणि रस्ता सुरक्षेचे मुद्दे मोठ्या प्रमाणावर समजून घेण्यासाठी मोहीम राबवतील. जीवघेण्या रस्ते अपघातांमध्ये ३६.९ टक्के घटवाहतूक विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत ३३६ अपघातांमध्ये ३५८ हून अधिक मृत्यू झाले होते, तर चालू वर्षाच्या आकडेवारीनुसार २१२ प्राणघातक अपघातांमध्ये २२३ जणांचा मृत्यू झाला होता. या आकडेवारीवरून असे दिसून येते की, जीवघेण्या रस्ते अपघातांमध्ये ३६.९ टक्के घट झाली. 

टॅग्स :Accidentअपघात