शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

राज्यात येणार ३५ हजार कोटींचे उद्योग; २३ हजार तरुणांना मिळणार रोजगार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 06:38 IST

Uddhav Thackeray : लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात सरकारने १६ हजार  काेटींच्या गुंतवणुकीचे करार केले होते. त्यातील ६० टक्के उद्योगांच्या जमीन अधिग्रहणासारख्या महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी   सांगितले.

मुंबई : तब्बल ३४ हजार ८५०  काेटींच्या गुंतवणुकीसह २३ हजार १८४ जणांना रोजगार देण्याची क्षमता असलेल्या उद्योगांची उभारणी महाराष्ट्रात होणार असून त्यासाठीच्या सामंजस्य करारांवर सोमवारी स्वाक्षरी करण्यात आल्या. मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यात एक लाख कोटींची गुंतवणूक करण्याचे लक्ष्य पूर्ण करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात सरकारने १६ हजार  काेटींच्या गुंतवणुकीचे करार केले होते. त्यातील ६० टक्के उद्योगांच्या जमीन अधिग्रहणासारख्या महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी   सांगितले. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या कार्यक्रमाला उद्योग मंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री आदिती तटकरे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात  राज्य गुंतवणुकीचे लक्ष्य सहज साध्य करेल असा विश्वासही देसाई यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता,  प्रधान सचिव भूषण गगराणी,  वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी.अनबलगन आणि गुंतवणूकदार उपस्थित होते.

बेराेजगारीच्या दरात ऑक्टाेबरमध्ये वाढदेशात ऑक्टाेबरमध्ये बेराेजगारीचे प्रमाण वाढल्याचे सेंटर फाॅर माॅनिटरींग इंडियन इकाॅनाॅमी अर्थात ‘सीएमआयई’च्या आकडेवारीतून समाेर आले आहे. यानुसार ऑक्टाेबरमध्ये बेराेजगारीचा दर ६.९८ टक्के एवढा हाेता. तर सप्टेंबरमध्ये हाच दर ६.६७ टक्के हाेता.     - वृत्त/ अर्थचक्र

या कंपन्या करणार गुंतवणूक

मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडिया प्रा. लि.     जपान     ब्राईट सिनो होल्डिंग प्रा. लि.     भारत    ओरिएंटल एॅरोमॅटिक्स प्रा. लि.     भारत  मालपानी वेअरहाऊसिंग पार्क     भारत    एव्हरमिंट लॉजिस्टिक्स    भारत    पारिबा लॉजिस्टिक्स पार्क     भारत   ईश्वर लॉजिस्टिक्स पार्क    भारत    नेट मॅजिक आयटी सर्व्हिसेस     भारत   अदानी एन्टरप्राइजेस लि.    भारत    मंत्र डेटा सेंटर    स्पेन    एसटीटी ग्लोबल डेटा सेंटर्स     भारत   कोल्ट डेटा सेंटर्स     इंग्लंड    प्रिन्स्टन डिजिटल ग्रुप     सिंगापूर    नेस्क्ट्रा    भारत    इएसआर इंडिया     सिंगापूर    

केमिकल, डेटा यासह लॉजिस्टिक, मॅन्युफॅक्चरिंग अशा क्षेत्रातील उद्योग राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. महाराष्ट्र हा डेटा सेंटरच्या बाबतीतही देशाचे महत्वाचे केंद्र बनेल असा मला विश्वास आहे.- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेjobनोकरीMaharashtraमहाराष्ट्रbusinessव्यवसाय