हितेन नाईक,पालघर- वसई तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या ३३ शिक्षकांनी गैरमार्गाने पदवी प्राप्त करून वेतनोन्नती मिळवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शालेय शिक्षण विभागाच्या अवर सचिवाने याप्रकरणी संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषद पालघर यांना दिले आहेत.ठाणे जिल्हा परिषद अस्तित्वात असताना या ३३ शिक्षकांची निकषांच्या आधारे जिल्हा परिषदेच्या शाळेत उपशिक्षक म्हणून पदभरती झाली. तदनंतर, या सर्र्वांनी पुढचे शिक्षण घेऊन त्या पदवीच्या आधारे पदवीधर शिक्षक म्हणून शासनाकडून पदोन्नती व वेतनोन्नती मिळवली. मात्र, पदोन्नतीसाठी पुढचे शिक्षण किंवा पदवी घेऊन पदवीधर शिक्षक होण्यासाठी कायदेशीर रजा घेणे अपेक्षित असताना त्यांनी यासाठी रजा न घेताच संबंधित ठिकाणी बीएड आणि बीपीएडचे शिक्षण घेत राहिले. शाळेवर शिक्षक म्हणून कामही करीत असल्याचे दाखवले. अशा वेळी एक शिक्षक दोन्ही ठिकाणी एकाच वेळी कसे काम करू शकतो, यासंदर्भात वसई भाजपाचे शहराध्यक्ष मारुती घुटुकडे यांनी तक्र ार दाखल केली होती. शासनाच्या निकषानुसार अशी पदवी अगर तत्सम बढतीसाठी शिक्षणास मुभा आहे, पण त्यासाठी लागणाऱ्या कालावधीच्या शासनसेवेची रजा घेणे बंधनकारक आहे. मात्र, वसई येथील या प्रकरणात चक्क एक व्यक्ती दोन ठिकाणी आणि तेही त्याच कालावधीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शासनाची फसवणूक करणाऱ्या या ३३ शिक्षकांना दिलेली पदोन्नती रद्द करून त्यांच्या मूळपदी (उपशिक्षक) कायम ठेवावे तसेच वेतनोन्नती दिलेल्या तारखेपासून त्या रकमेची वसुली करण्यात येऊन संबंधित शिक्षकांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश अवर सचिवांनी जिल्हा परिषदेस दिल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी कारवाईचा बडगा उचलला असल्याचे सांगितले.भाजपाचे मारुती घुटुकुडे यांनी केलेल्या तक्रारवजा अर्जामुळे ही चौकशी सुरू झाली असून अशा प्रकारच्या अनियमित व शासनाची फसवणूक करणाऱ्यांविरोधात सध्यातरी वसई तालुक्यातील ३३ शिक्षकांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळली आहे. परंतु अशा प्रकारे गैरवर्तणूक करणाऱ्या अनेकांवर कारवाईचे संकेत मिळत आहेत.>वेतनोन्नती घेतलेले जिल्हा परिषद शिक्षकदीपा पाटील (चिखलडोंगरी), रमेश पिंपळे (अर्नाळा, बॉलिबना थॉमस सिल्वेरा नवघर मराठी), मदन चौधरी (नायगाव), आरती पिंपळे (चुळणे), प्रणवी भोईर (तुळिंज-१), हिल्डा डिमेलो (तुळिंज-१), कल्याणी भोईर (तुळिंज-२), सुनीता लुजार (धानीव) , गीता किणी (कणेर), वृषाली बोरसे (वालीव), डेला डिसेल्वा (भोयदापाडा), सुनील गोन्साल्वीस (गोखिवरे-१), बीना कव्हार्लो (नवजीवन), शर्मिला पाटील (नवजीवन), वैशाली डिमेलो ( गोखिवरे-२), बाबू वनगा (सकवार), प्रेमनाथ नाईक (मेढे), अशोक पाटील (सायवन), किशोर पाटील (सायवन), एलीझा दोडती (आचोळे-१), सुनीता विहोल (कन्या गुजराती), नीता पांचाळ (गावठाण गुजराती), मानसी पिंपळे (विरार-१), दीपा वडे ( मनवेलपाडा-२), हरेश ठाकरे (शिरवली).अर्धवेळ बीएड, बीपीएडप्रीती पाटील (मनवेलपाडा-२), अनिता सिक्वेरा (दिवाणमान), स्मिता भातगावकर (बिलालपाडा), अनंत किणी (कसराळी), जगदीश म्हात्रे (भाताणे), मेधा पाटील (भाताणे), श्याम पंडित (विरार पूर्व)
जि.प.च्या ३३ शिक्षकांनी मिळवली लबाडीने वेतनोन्नती
By admin | Updated: April 8, 2017 04:14 IST