33% is Daily participation of laundry men | कपडे धुण्यातील पुरुषांचा दैनंदिन सहभाग ३३ टक्के
कपडे धुण्यातील पुरुषांचा दैनंदिन सहभाग ३३ टक्के

- लोकमत इनसाइट्स टीम

मुंबई : कपडे धुणे ही आपल्या सर्वांच्या घरामधील एक दैनंदिन गोष्ट. बहुसंख्य ठिकाणी ही जबाबदारी घरातील अथवा कामवाल्या स्त्रियांची असली, तरी काळानुसार त्यामध्ये बदल होत असलेला दिसतो. लोकमत इनसाइट्स टीमने महाराष्टÑाच्या शहरी भागामध्ये केलेल्या सर्वेक्षणामधून सुमारे ३३ टक्के पुरुष कपडे धुण्याचे काम करीत असल्याचे दिसून आले आहे. स्त्री-पुरुष समानतेकडे नेणारे हे एक पाऊलच म्हणावे लागेल.
‘लोकमत’च्या टीमने राज्याच्या विविध शहरांमध्ये भेट देऊन कपडे धुण्याच्या सवयीबाबत केलेले सर्वेक्षण आणि नागरिकांकडून वॉशिंग पावडरचे वापरले जाणारे विविध ब्रॅण्डस् यांची माहिती करून घेतली. त्यानुसार, शहरी भागामध्ये कपडे धुण्याची प्राथमिक जबाबदारी अद्याप स्त्रियांचीच असली, तरी आता काही प्रमाणामध्ये पुरुषांचा त्यामधील सहभाग वाढतो आहे. कदाचित यामुळेच कामवाल्या बायांची संख्या कमी होताना दिसून येत आहे.
सुमारे ३३ टक्के पुरुष हे घरातील कपडे धुण्याची जबाबदारी घेताना आढळून आले. यापैकी १६ टक्के पुरुष हे काम स्वत: करतात, तर १७ टक्के पुरुष यासाठी कुटुंबातील सदस्यांची मदत घेत असल्याचेही दिसून आले.
कपडे स्वत: धुण्याचे प्रमाण ४८ टक्के असून यामधील ६५ टक्के प्रमाण हे स्त्रियांचे तर १६ टक्के पुरुषांचे आहे. स्वत: अथवा अन्यांमार्फत कपडे धुतले जाण्याचे प्रमाण १८ टक्के आहे. यामध्ये पुरुष १७ तर महिलांचे प्रमाण १८ टक्के एवढे आहे.
पति अथवा पत्नीकडून हे काम केले जाण्याचे प्रमाण १६ टक्के असून, त्यापैकी ३६ टक्के प्रमाण हे पुरुषांचे म्हणजेच पतीचे आहे. तर महिलांचे प्रमाण अवघे ५ टक्के आहे. घरातील कोणत्या तरी एका सदस्याने कपडे धुण्याचे प्रमाण ९ टक्के आहे. यामध्ये पुरुष २३ टक्के तर महिला २ टक्के असे व्यस्त प्रमाण बघावयास मिळत आहे. घरगुती कामगारांकडून कपडे धुतले जाण्याचे राज्याच्या शहरी भागामधील प्रमाण हे अवघे ९ टक्के आहे. मात्र, यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक असलेले दिसून येते. १० टक्के महिला हे काम करतात, तर ९ टक्के पुरूष कामगार कपडे धूत असतात.

मशिनचा वापर केवळ ११ टक्के : कपडे धुण्यासाठी मशिनचा वापर ११ टक्के लोकांकडून केला जातो. ३२ टक्के नागरिक हे हात आणि मशिन अशा दोन्ही प्रकारांनी कपडे धूत असतात. यामुळे कपडे अधिक स्वच्छ निघत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. विविध ब्रॅण्ड्सनी मशिनचा वापर वाढावा, यासाठी केलेले प्रयत्न अद्याप तरी फलद्रूप झालेले दिसून येत नाहीत.

दररोज कपडे धुण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ६४ टक्के असल्याचे या सर्वेक्षणामधून उघड झाले आहे. यापैकी 18% व्यक्ती या आठवड्यातून ५ ते ६ वेळा कपडे धुतात. या कपड्यांचे प्रमाण प्रत्येक वेळी सरासरी दोन बादल्या एवढे असते.

दररोज कपडे धुण्याचे प्रमाण 64%

महाराष्टÑातील ६० टक्के नागरिक हे कपडे धुण्यासाठी ३० मिनिटे ते एक तासापर्यंतचा वेळ प्रत्येक वेळी देत असतात. ३० टक्के व्यक्तिंना ३० मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो, तर १० टक्के व्यक्तिंना कपडे धुण्याला एक तासापेक्षा अधिक वेळ लागतो, असे दिसून आले.


कपडे धुण्यासाठी  विविध ब्रॅण्डचा वापर
ब्रॅण्ड गेल्या सध्याचा बहुतेक वेळा
वर्षातील
एरिअल ४४ ४३ २८
रिन ५३ ५० २२
निरमा ५० ४७ १६
सर्फ एक्सेल ३१ ३४ ०८
व्हील ३८ ३८ ०७
घडी २१ २० ०७
टाईड ४२ ३८ ०५
फेना ११ १० ०२
हेन्को ०६ ०६ ०१
सफेद ०५ ०६ ०१
टाईड नॅचरल्स ०४ ०३ ००
ससा ०५ ०३ ००
सनलाईट ०२ ०२ ००
इतर ०५ ०६ ०३
(आकडे टक्क्यांत)

जबाबदारीनुसार कामाची विभागणी
जबाबदारी शहरात पुरुष महिला
स्वत: ४८% १६% ६५%
स्वत: किंवा इतर १८% १७% १८%
जोडीदार १६% ३६% ०५%
कुटुंबातील
अन्य सदस्य ०९% २३% ०२%
कामगार ०९% ०९% १०%

( *स्त्रोत : या सर्व मजकुराचा स्त्रोत हा लोकमतच्या इनसाइटस् टीमने सर्वेक्षण करून काढलेले निष्कर्ष, तसेच वेगवेगळे अहवाल व कंपन्यांच्या संकेत स्थळांवरील माहिती हा आहे.)

लोकमत इनसाइट्स टीमतर्फे बाजारपेठ, तसेच ग्राहकांमध्ये सर्वेक्षण करून त्याचे निष्कर्ष हे वाचकांपर्यंत पोहोचविले जातात. याबाबतच्या आपल्या प्रतिक्रिया lokmatinsights@lokmat.com यावर कळवाव्यात.

Web Title: 33% is Daily participation of laundry men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.