शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रनिकेतनचे ४९ पैकी ३२ विद्यार्थी अनुत्तीर्ण

By admin | Updated: July 7, 2016 17:36 IST

येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विविध समस्यांमुळे आधीच विद्यार्थी जेरीस आलेले असतांना आता पुन्हा विद्यार्थ्यांच्या नापास सत्रामुळे महाविद्यालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. ७ : येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विविध समस्यांमुळे आधीच विद्यार्थी जेरीस आलेले असतांना आता पुन्हा विद्यार्थ्यांच्या नापास सत्रामुळे महाविद्यालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अंतिम वर्षाच्या ४९ विद्यार्थ्यांपैकी अवघे १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तर पत्रिका तपासणीत घोळ झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे.

येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात आहे. या ना त्या समस्यांमुळे विद्यार्थी जेरीस आलेले आहेत. गुणवत्तेबाबत देखील महाविद्यालयाने दुर्लक्ष केल्याने येथे प्रवेश घेण्यास देखील विद्यार्थी कचरतात. आता निकालाबाबत महाविद्यालयातील विद्यार्थी संतापले आहेत. अंतिम वर्षाला महाविद्यालयात ४९ विद्यार्थी होते. या विद्यार्थ्यांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यात तब्बल ३२ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. अवघे १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांनाही जेमतेमच गुण असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सर्वच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पुर्नरमुल्यांकनासाठी अर्ज केला असता त्यांना पॉवर इलेक्ट्रॉनिक्स या विषयाची उत्तर पत्रिकेची झेरॉक्स प्रत देण्यात आली. त्या प्रतमध्ये उत्तर पत्रिकेतील तपासणीची तफावत असल्याचे स्पष्ट झाले. त्यात मोठ्या प्रमाणावर गोंधळ देखील असल्याचे स्पष्ट झाले आहे. उत्तर पत्रिकेतील प्रश्नांचे उत्तर तपासणीमध्ये प्रश्नांचे उत्तर बरोबर असून देखील ते चुकीचे आहे असे दर्शविण्यात आले. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सहा गुण मिळतील त्या ठिकाणी त्यांना केवळ एक किंवा दोन गुण दिले आहेत. काही प्रश्नांची उत्तरे देखील तपासण्यात आलेली नाहीत. त्यामुळे उत्तर पत्रिकेतील घोळामुळे येथील महाविद्यालयातील जवळपास ३२ विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला.