शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेची ३१ कोटींची एफडी हडपली; पाच जणांना अटक, १२ ठिकाणी सीबीआयचे छापे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 16:00 IST

याप्रकरणी सोमवारी मुंबई, गोवा आणि हिमाचल प्रदेशात एकूण १२ ठिकाणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली.

मुंबई : रेल्वे मंत्रालयांतर्गत येणाऱ्या रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाची ३१ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम हडप केल्याप्रकरणी सीबीआयने पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये मुंबईतील दोघांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये, रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाचा माजी व्यवस्थापक विवेक कुमार, बँक ऑफ बडोदाचा माजी शाखा व्यवस्थापक जसवंत राय, दिल्लीस्थित मध्यस्थ गोपाल ठाकूर, मुंबईतील मध्यस्थ हितेश करेलिया आणि नीलेश भट यांचा समावेश आहे. या सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

१२ ठिकाणी सीबीआयचे छापे-  याप्रकरणी सोमवारी मुंबई, गोवा आणि हिमाचल प्रदेशात एकूण १२ ठिकाणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. उपलब्ध माहितीनुसार, रेल्वे जमीन विकास प्राधीकरणाने बँक ऑफ बडोदाच्या दिल्ली येथील शाखेमध्ये ३५ कोटी रुपये एक वर्षासाठी मुदत ठेवीमध्ये गुंतवले होते. -  एक वर्षाचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर आणखी तीन महिन्यांसाठी या मुदतठेवीचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. -  या प्रक्रियेत सहभागी असलेल्या आणि आता आरोपी असलेल्या या पाचही जणांनी संगनमताने या रकमेतील ३१ कोटी ५० लाख रुपये काढून घेतले व केवळ साडे तीन कोटी रुपये आगामी तीन महिन्यांसाठी गुंतवले.-  या पैशांची फिरवाफिरवी करण्याकरिता मुंबईत काही बनावट कंपन्या स्थापन करण्यात आल्या होत्या. या कंपन्यांत हे पैसे जमा केल्यानंतर तेथून ते रोखीने काढत आरोपींनी हे पैसे वाटून घेतल्याचा आरोप आहे.

टॅग्स :Central Bureau of Investigationकेंद्रीय गुन्हे अन्वेषणrailwayरेल्वे