शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाला ३०० फाइल्स निकाली -मुख्यमंत्री

By admin | Updated: December 2, 2014 04:30 IST

दर्यावरचा कोळी आणि आगरावरचा आगरी हे महाराष्ट्राचे त्याहीपेक्षा कोकणाचे वैभव आहेत. आगरी समाजाचा पराक्रम छ. शिवाजी महाराजांच्या मावळयामध्येही आहे

डोंबिवली : दर्यावरचा कोळी आणि आगरावरचा आगरी हे महाराष्ट्राचे त्याहीपेक्षा कोकणाचे वैभव आहेत. आगरी समाजाचा पराक्रम छ. शिवाजी महाराजांच्या मावळयामध्येही आहे. अन्यायाविरुद्ध संघर्ष करणे हा त्यांचा महत्वाचा गुण आहे. त्यामुळेच त्या समाजाप्रती विशेष जिव्हाळा असून त्यांना भेडसावणाऱ्या बहुतांशी अडीअडचणी मी माझ्या सहकाऱ्यांसमवेत बसून-चर्चा करुन न्यायालयीन प्रक्रिया वगळता जेवढी प्रकरणे निकालात काढता येतील, तेवढी निश्चितपणे काढीन, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी डोंबिवली आगरी महोत्सवाच्या शुभारंभाप्रसंगी काढले. येथील एमआडयीसी पसिरातील क्रीडा संकुलनाच्या पटांगणावर या महोत्सवाचा सोमवारी शुभारंभ झाला़ त्यावेळी उद्घाटक म्हणून ते उपस्थित होते. महोत्सवाचे आयोजक गुलाब वझे यांनी मांडलेल्या समस्यांना उत्तर देतांना ते बोलत होते. ते म्हणाले की, दिवसाला ३०० फाईल निकाली लावत असून सकाळी आलेली फाईल संध्याकाळपर्यंत विधी विभागासह अन्य तांत्रिक अडचणी वगळता तातडीने निपटारा करण्याच्या सूचनाच संबंधित विभागाला दिल्या आहेत. त्या पद्धतीनेच जेमतेम महिनाच झाला असून काम सुरु असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कल्याण-डोंबिवली परिसरातील आगरी बांधवांच्या समस्यांसंदर्भात ते म्हणाले की, या समाजबांधवांना एक महाविद्यालय काढायचे आहे, त्यासाठी तातडीने विचार केला जाईल व तसे कळविले जाईल, तसेच आगरी समाज भवनाची जी मागणी गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे ती न्याय प्रविष्ट असल्याने जो काही निर्णय येईल तोपर्यंत त्या जागेवर कोणालाही दावा करु देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले. (प्रतिनिधी)