शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 12:04 IST

या बैठकीआधी नाशिकच्या काही शेतकरी संघटनांनी कोकाटे यांच्या समर्थनार्थ अजितदादांची भेट घेतली. कोकाटे यांचा राजीनामा घेऊ नका अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली

मुंबई - विधानसभा सभागृहात ऑनलाईन रमी खेळताना अडचणीत आलेल्या माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रि‍पदावर गंडांतर आले आहे. कोकाटे यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे विरोधकांनी सरकारवर घणाघात केला. त्यात माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी सातत्याने दबाव वाढत चालला होता. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीआधी माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास ३० मिनिटे चर्चा झाली. या बैठकीत कोकाटे यांनी घडलेल्या प्रकारावर दिलगिरी व्यक्त केली परंतु अजित पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 

या बैठकीत माणिकराव कोकाटे यांनी भविष्यात अशी चूक होणार नाही अशी ग्वाही दिली.  माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सातत्याने होत आहे. मात्र कोकाटे यांना भेटल्यावरच राजीनाम्याचा निर्णय घेऊ अशी माहिती अजित पवारांनी दिली होती. माणिकराव कोकाटे यांनी याआधीही बरीच वादग्रस्त विधाने केली होती त्यामुळे कोकाटे यांच्याविषयी नाराजी आणखी वाढली आहे. अजित पवारांनी याआधी कोकाटे यांना समज दिली होती परंतु कोकाटे यांच्या वागणुकीत फारसा फरक पडला नाही. मात्र रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला आणि कोकाटे यांच्या अडचणीत भर पडली. 

या बैठकीआधी नाशिकच्या काही शेतकरी संघटनांनी कोकाटे यांच्या समर्थनार्थ अजितदादांची भेट घेतली. कोकाटे यांचा राजीनामा घेऊ नका अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली. मात्र किती वेळा चुका माफ करायच्या, मंत्रिपद दिले तेव्हा तुम्ही कोण आले नाही आज राजीनामा नको म्हणून आलात असं सांगत अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्याविषयी कारवाईचे संकेत दिले होते. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत पक्षातही २ मतप्रवाह आहेत. त्यात कोकाटे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा राजीनामा घेऊ नका असं काहींचे म्हणणे आहे तर कोकाटेंचा राजीनामा घ्यायला हवा अन्यथा आगामी निवडणुकीत त्याचा फटका पक्षाला बसू शकतो असंही काही नेते म्हणत आहेत. त्यामुळे कोकाटे यांच्या बैठकीनंतर आता अजित पवार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, माणिकराव कोकाटे यांनी रविवारी शनिमांडळ येथील प्रसिद्ध शनिमंदिरात जाऊन दर्शन घेतले. मंदिरात विधिवत पूजा करून शनिदेवाला अभिषेक केला. आपल्यावरील संकट दूर करण्यासाठी त्यांनी शनिदेवाला साकडे घातले असे म्हटले जात आहे. गेल्या काही काळापासून मंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांविषयीची वादग्रस्त वक्तव्ये आणि विधिमंडळात व्हिडीओ व्हायरलमुळे चर्चेत आहेत. शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य, विधिमंडळात पत्ते खेळतानाचा व्हायरल झालेला व्हिडीओ, शासन भिकारी या अशा विधानांनी ते वादात अडकले.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारManikrao Kokateमाणिकराव कोकाटेNCPराष्ट्रवादी काँग्रेसFarmerशेतकरी