कसाऱ्यात ३० तास "ब्लॅकआऊट", खंडित वीजपुरवठ्यामुळे व्यापाऱ्यांचे हजारोचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 04:45 PM2021-09-04T16:45:22+5:302021-09-04T16:46:26+5:30

दुरूस्तीसाठी लागला ३० तासांचा कालावधी. शुक्रवारी सकाळी दुरुस्तीसाठी खंडित करण्यात आला होता वीजपुरवठा.

30 hour blackout in Kasara thousands of traders loss due to power outage | कसाऱ्यात ३० तास "ब्लॅकआऊट", खंडित वीजपुरवठ्यामुळे व्यापाऱ्यांचे हजारोचे नुकसान

कसाऱ्यात ३० तास "ब्लॅकआऊट", खंडित वीजपुरवठ्यामुळे व्यापाऱ्यांचे हजारोचे नुकसान

Next
ठळक मुद्देदुरूस्तीसाठी लागला ३० तासांचा कालावधी.शुक्रवारी सकाळी दुरुस्तीसाठी खंडित करण्यात आला होता वीजपुरवठा 

शुक्रवारी सकाळी नऊ वाजल्यापासून खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा तब्बल ३० तासांनंतर आल्याने वीजग्राहकांनी सुटकेचा निश्वास सोडला. शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून दुरुस्तीच्या कामासाठी महाराष्ट्र वीज वितरण कंपनी व भारत पेट्रोलियम कॅर्पोरेशन कंपनी ने बी.पी.सी.एल. पॉवर हाऊसशी निगडित असलेल्या कसारा ,वाशाळा सह काही ठिकाणचा वीज पुरवठा खंडित केला होता. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेसाठी खडीत केलेला विज पुरवठा पूर्ववर्त् करण्यासाठी म. रा.वी.म व बि. पि. सी .एल कंम्पनीला अपयश आल्याने कसारा वासियांना तब्बल ३० तासांच्या ब्लॅकआऊटला समोरे जावे लागले.

सकाळी १० वाजेपासून दुरुस्ती कामाला वॉशाळा सब सेंटरला सुरुवात झाल्यानंतर महत्त्वाच्या हाय टेंशनच्या वायरी बदलण्याचे काम देखील हाती घेण्यात आले होते. परिणामी दुरुस्ती कामावेळी काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांना रात्री उशिरा पर्यंत दुरुस्ती कामात अपयश आल्याने रात्री ११ वाजता पडघा ,भिवंडी येथील कर्मचाऱ्यांना सब सेंटरला पाचरण करण्यात आले. परंतु रात्रीचा अंधार व पाऊस या मुळे म. रा.वी.म आणि बी.पी.सी.एल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दुरुस्ती मोहिमेत अडथळे निर्माण होत होते.

तज्ज्ञ अभियंते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या कमावेळी रात्री एकच्या दरम्यान अचानक घाटघर वीज प्रकल्पातून येणाऱ्या उच्चदाब वीज वाहिनीत  तांत्रिक बिघाड झाल्याने कर्मचाऱ्यांचे काम वाढले. रात्रभर काम करून देखील दुरुस्ती पूर्ववत न झाल्याने शनिवारी सकाळी घाटघर येथून येणारी उच्चदाब वीज वाहिनी बदलण्यात आली आणि शनिवारी दुपारी ३ वाजता कसाऱ्यासह अन्य भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. तब्ब्ल ३० तासांनी वीज आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

२४ तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे कौतुक
दरम्यान शुक्रवार सकाळी १० वाजेपासून दुरुस्ती कामासाठी झटत असलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र २४ तास मेहनत घेत तब्बल ३० तासांनी वीजपुरवठा सुरळीत केला. या विशेष कामगिरीचे  वीजग्राहकांकडून कौतुक केले जात आहे.

व्यापाऱ्यांचे हजारोचे नुकसान
दरम्यान ३० तासाच्या ब्लॅकआउटमुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. विशेषतः दुध, वैद्यकीय व्यवसायिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.

Web Title: 30 hour blackout in Kasara thousands of traders loss due to power outage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.