शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्रिपदावरून ‘मविआ’त ३ पक्षांची ३ मते; शरद पवार म्हणाले, आम्हाला स्वारस्य नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 08:53 IST

उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना, चार भिंतींच्या आड तरी ‘मविआ’ने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवावा.

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरविण्याच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीत मतभिन्नता दिसून आली आहे. तीन पक्षांची तीन वेगवेगळी मते समोर आली आहेत.  उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना, चार भिंतींच्या आड तरी ‘मविआ’ने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवावा.

ज्या पक्षाच्या जास्त जागा निवडून येतील, त्या पक्षाला मुख्यमंत्रिपद हा फॉर्म्युला ठरवू नये; कारण त्यामुळे एकमेकांच्या जागा पाडल्या जातात, कोणताही चेहरा ‘मविआ’ने ठरवावा, आपण पाठिंबा देऊ, असे म्हटले होते. त्यावर शुक्रवारी शरद पवार यांनी सध्याच्या सरकारला पर्याय कसा देता येईल, यालाच महत्त्व द्यायला हवे, आधी सत्तापरिवर्तन, असे म्हटले.

ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची चूक पवार करणार नाहीत : बावनकुळेमुख्यमंत्री होता यावे यासाठी उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीची साथ सोडू शकतात; तर ते आपल्याही पाठीत केव्हाही खंजीर खुपसू शकतात, हे शरद पवार यांना  माहिती आहे. त्यामुळे ते उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची कधीही चूक करणार नाहीत, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात केला. उद्धव ठाकरे हे काँग्रेस व शरद पवार गटाच्या जाळ्यात फसले आहेत. काँग्रेसमध्ये नाना पटोले, विजय वडेट्टीवार व बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्री पदासाठी बाशिंग बांधून आहेत. सोबतच सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचा शरद पवारांचा मनसुबा आहे. यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी याचना करीत आहेत.  उद्धव ठाकरेंनी अमित शहा यांच्या नावावर जसा खोटारडेपणा केला, तसाच खोटारडेपणा ते शरद पवारांच्या नावाने करतील. मुख्यमंत्रिपद मिळविण्याकरिता उद्धव ठाकरे दिल्लीला गेले होते; पण त्यांना तेथून पिटाळून लावले, असा दावाही बावनकुळे यांनी केला.

तिन्ही पक्षांचे श्रेष्ठी निर्णय घेतीलकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नाशिकमध्ये म्हणाले की,  विधानसभा निवडणुकीत ‘मविआ’ हाच चेहरा बनून जनतेसमोर जाऊ.नागरिकांनी ‘मविआ’ला सत्ता दिल्यास तिन्ही पक्षांचे श्रेष्ठी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतील. चार भिंतींत तरी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवा, असा कोणताही विषयच चर्चिला गेलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सत्ता परिवर्तन महत्त्वाचेज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुण्यात शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना याबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की,  निवडणुकीआधी मुख्यमंत्री कोण हे ठरवण्यात आमच्या पक्षाला स्वारस्य नाही, सत्ता परिवर्तन होणे हे मला महत्त्वाचे वाटते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार