शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

राज्यातील 288 आमदार बिनकामाचे, शिवरायांच्या नावाचा वापर फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी- संभाजी भिडे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 10:54 AM

राज्यातील 288 आमदार हे बिनकामाचे आहेत, असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केलं आहे.

सांगली- राज्यातील 288 आमदार हे बिनकामाचे आहेत, असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केलं आहे. सांगलीतल्या तासगावात झालेल्या धारकऱ्यांच्या गडकोट मोहिमेच्या बैठकीत ते बोलत होते. आतापर्यंत शिवरायांच्या नावाचा वापर राज्यकर्त्यांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी केला, असा थेट आरोपही संभाजी भिडे यांनी केला आहे.सध्याच्या राज्यकर्त्यांपैकी एकालाही प्रतापगडाच्या कुशीत महाराजांचं स्मारक व्हावे, असं का वाटत नाही? असा सवाल संभाजी भिडे यांनी यावेळी उपस्थित केला.

'आजपर्यत शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर राज्यकर्त्यांनी आपल्या सोयीस्कर राजकारणानुसार केला. या लोकांना शिवरायांच्या विचारांशी, त्यांच्या कार्याशी देणं घेणं नाही. प्रतापगडाच्या कुशीत शिवरायांचं स्मारक व्हावे यासाठी सध्या कुणीच प्रयत्न करत नाही. त्यामुळे राज्यातील 288 आमदार हे जवळसपास बिनकामाचे आहेत, असं म्हणत संभाजी भिडे यांनी आमदारांवर निशाणा साधला.यावेळी भिडे गुरुजींनी भाजपचे खासदार संजय पाटील यांनाही लक्ष्य केलं. खासदार संजय पाटील हे मराठा आहेत. पण शिवरायांचं स्मारक व्हावं, असं ते कधीही म्हणाले नाहीत. शिवरायांच्या नावाचा वापर करुन राजकारण केले जात आहे. आपला देश दहशतवाद, आंतकवाद यामध्ये सापडलेला आहे. मात्र तो आतंकवाद संपवण्यासाठी शिवरायांनी घालून दिलेली शिकवण आज कोणीच अंमलात आणत नाही. राज्यात शिवरायांचे हजारो पुतळे उभे केले आहेत, हे राज्यकर्त्यांचे केवळ नाटक आहे, असंही संभाजी भिडे म्हणाले आहेत.  

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीMLAआमदार