शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

साई संस्थानकडून शासनाला १४ वर्षांत २५० कोटींची मदत

By admin | Published: May 19, 2015 1:40 AM

संस्थानच्या विकासात्मक बाबींसाठी आर्थिक मदत तर दूरच परवानगी देण्यासाठीही टाळाटाळ करत विश्वस्त मंडळ नियुक्तीलाही सरकारला सवड नसल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे़

प्रमोद आहेर ल्ल शिर्डीगेल्या चौदा वर्षांत साईबाबा संस्थानने शासनाच्या विविध विकास कामांसाठी तब्बल अडीचशे कोटींची मदत केली सरकारने मात्र संस्थानच्या विकासात्मक बाबींसाठी आर्थिक मदत तर दूरच परवानगी देण्यासाठीही टाळाटाळ करत विश्वस्त मंडळ नियुक्तीलाही सरकारला सवड नसल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे़नैसर्गिक, राष्ट्रीय आपत्तीतच नव्हे तर शासनाची जबाबदारी असलेल्या विकास कामांनाही संस्थान देणगीतून यथाशक्ती मदत करते़ नुकतीच संस्थानने ‘जलशिवार’साठी ३४ कोटींची मदत देऊ केली आहे़ गेल्या चौदा वर्षांत पूर, दुष्काळ, त्सुनामी,भूकंप, मुख्यमंत्री व पंतप्रधान निधी, शाळा- कॉलेजला मदत, ग्रामपंचायतींना मदत, साईगणेश बंधारे, विमानतळ, जिल्हा परिषद शाळांना बेंचेस, अन्य देवस्थानांचा विकास आदी कामांसाठी गेल्या चौदा वर्षांत संस्थानने तब्बल २५० कोटींचा निधी दिल्याचे मुख्य लेखाधिकारी दिलीप झिरपे यांनी ‘लोकमत’ला सांगितले़ त्यातच संस्थानचे जीवनदायी योजनेचे ३८ कोटी गेल्या दोन वर्षांपासून शासनाकडे अडकले आहेत, तर शंभर कोटींहून अधिक रक्कम संस्थानने राज्यातील हजारो गरजू रूग्णांना उपचारासाठी खर्च केली आहे़समाजोपयोगी व शासनाला पूरक कामे करत असूनही संस्थानला शासनाकडून नेहमीच सापत्नपणाची वागणूक मिळत असल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. राज्यातील प्रथम क्रमांकाचे देवस्थान म्हणवणाऱ्या संस्थानच्या विकासकामांचे डझनवारी प्रस्ताव गेल्या सरकारच्या दरबारी पडून होते़ ते विश्वस्त मंडळाची नियुक्तीही करू शकले नाहीत, त्यानंतर आलेल्या सरकारने दहा महिन्यांत घोषणा देण्यापलिकडे अद्याप काही केले नाही़सिंहस्थ दोन महिन्यांवर येऊन ठेपले असताना अद्याप शिर्डीत स्थानिक पातळीवर बैठकांच्या उठबशा सुरू आहेत़ नाशिकला सिंहस्थासाठी तेवीसशे कोटींचा निधी देण्यात आला, त्यातील पन्नास टक्के भाविक शिर्डीला येण्याची शक्यता असतानाही शिर्डीला मात्र ठेंगा दाखवण्यात आला़ विश्वस्त मंडळ नसल्याने निर्णय प्रक्रिया रखडल्या. संस्थानकडे निधी असूनही परवानग्यांच्या जंजाळात अडकल्याने भाविकांच्या समस्या कायम आहेत़ कचरा, पाणी, वाहनतळ, दर्शनबारी, स्वच्छतागृहे अशा एक ना अनेक समस्यांनी शिर्डीला घेरले आहे.राज्य सरकारणदील निम्म्याहून अधिक मंत्री साईभक्त असतानाही साईदरबारी समस्यांचे अमाप पीक आले आहे.34 कोटींची मदत ‘जलशिवार’ योजनेसाठीदेऊ केली250 कोटींचा निधी गेल्या चौदा वर्षांत संस्थानने पूर, दुष्काळ, त्सुनामी,भूकंप, मुख्यमंत्री व पंतप्रधान निधी, शाळा- कॉलेजला मदत, ग्रामपंचायतींना मदत, साईगणेश बंधारे, विमानतळ, जिल्हा परिषद शाळांना बेंचेस, अन्य देवस्थानांचा विकास आदी कामांसाठी दिला.38 कोटी जीवनदायी योजनेचे गेल्या दोन वर्षांपासून शासनाकडे अडकले आहेत