शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

२२ साखर कारखान्यांना मदत

By admin | Updated: August 26, 2015 01:17 IST

गेल्या हंगामात गाळप करून ५० टक्क्यांपेक्षा जास्त रास्त व किफायतशीर मूल्य (एफआरपी) रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली आहे. मात्र एनपीएमुळे केंद्र सरकारच्या निकषात

मुंबई : गेल्या हंगामात गाळप करून ५० टक्क्यांपेक्षा जास्त रास्त व किफायतशीर मूल्य (एफआरपी) रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली आहे. मात्र एनपीएमुळे केंद्र सरकारच्या निकषात न बसणाऱ्या २२ साखर कारखान्यांना शेतकऱ्यांची उर्वरित रक्कम चुकती करण्याकरिता राज्य सरकारने सॉफ्ट लोन देण्याची योजना राबवण्यासाठी १८७ कोटी ७६ लाख रुपये उपलब्ध करून देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. मात्र याकरिता साखर कारखान्यांबरोबरच संचालकांची मालमत्ता तारण ठेवण्याची अट असल्याने या योजनेला किती प्रतिसाद लाभेल याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.राज्यातील काही साखर कारखान्यांनी फक्त २०१४-१५ या वर्षाचा गाळप हंगाम घेतलेला आहे. तसेच एफआरपीची ५० टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम ३० जून २०१५ पर्यंत दिलेली आहे. अशा साखर कारखान्यांना एफआरपीची उर्वरित रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देता यावी यासाठी राज्य शासनामार्फत ही सॉफ्ट लोन योजना राबवण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या योजनेत नॉन परफॉर्मिंग अ‍ॅसेट झाल्याने हे कारखाने सामील होऊ शकले नव्हते. अशा एनपीएतील कारखान्यांना संचालक मंडळाच्या जबाबदारीवर शासन हमी देण्यात येईल. कर्जाच्या मुद्दलाची रक्कम वेळेवर न भरणाऱ्या कारखान्यांना योजनेतून तात्काळ वगळण्यात येणार आहे. सॉफ्ट लोन योजनेतील कारखान्यांना १० टक्के सरळ व्याज किंवा बँकेकडून आकारण्यात येणारा व्याजदर यामधील कमी असलेल्या व्याजदरानुसार पाच वर्षांचा रिड्यूसिंग बॅलन्सनुसार व्याजाची रक्कम राज्य शासन अनुदान स्वरुपात देणार आहे. या साखर कारखान्यांना १८७ कोटी ७६ लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिल्याने त्यावरील व्याजापोटी राज्य सरकारवर ५६ कोटी ३३ लाख रुपयांचा भार पडणार आहे. हमीपत्र देण्यास कारखाने अनुत्सुकराज्य सरकारच्या योजनेनुसार सॉफ्ट लोन घेणाऱ्या साखर कारखान्यांना कारखान्याची व संचालकांची मालमत्ता तारण ठेवण्याबाबत हमीपत्र द्यावे लागते. त्याला संचालकांचा तीव्र विरोध आहे. तसेच यापूर्वी ही कर्जाची रक्कम कारखान्याच्या बँक खात्यात जमा होत होती. आता ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळणे बाकी आहे त्यांची बँक खाती आधार कार्डाशी जोडलेली असल्यास त्या खात्यात रक्कम जमा होते. मात्र कर्जाचे दायित्व कारखान्यावर येते. त्यामुळे अनेक कारखाने हे सॉफ्ट लोन घेण्यास अनुत्सुक आहेत.योजनेस पात्र कारखानेसरसेनापती संताजी घोरपडे (कागल), ग्रीन पॉवर शुगर (खटाव), लोकनेते बाबुराव पाटील अ‍ॅग्रो इंडस्ट्री (कोल्हापूर), युरोपियन शुगर, भैरवनाथ शुगर, शंकरराव उद्योग ,बबनराव शिंदे शुगर मिल (सोलापूर), गणेश सहकारी (विठ्ठलराव विखे) साखर कारखाना, साईकृपा शुगर, पियुष साखर कारखाना (अहमदनगर), संत मुक्ताई (जळगाव), समर्थ सहकारी साखर कारखाना, वागेश्वर (जालना), जयभवानी, छत्रपती सहकारी साखर कारखाना (बीड), बळीराजा, रत्नप्रभा (परभणी), कुंटुरकर शुगर (नांदेड), कांचेश्वर (उस्मानाबाद), प्रियदर्शिनी (लातूर), संत एकनाथ (औरंगाबाद).