इसिसशी संबंधित 21 वर्षीय तरुणाला परभणीत अटक
By Admin | Updated: July 14, 2016 15:55 IST2016-07-14T15:55:12+5:302016-07-14T15:55:34+5:30
हाराष्ट्रातील तरुणांचं 'इसिस' या दहशतवादी संघटनेबद्दलचं आकर्षण कायम असून इसिसशी संबंधित आणखी एका तरुणाला परभणीतून अटक करण्यात आली आहे.

इसिसशी संबंधित 21 वर्षीय तरुणाला परभणीत अटक
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. १४ - महाराष्ट्रातील तरुणांचं 'इसिस' या दहशतवादी संघटनेबद्दलचं आकर्षण कायम असल्याचं चित्र आहे. कारण इसिसशी संबंधित आणखी एका तरुणाला परभणीतून अटक केली आहे. नसीरबिन याफी चाऊस असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे नसीरबिन हा अवघ्या 21 वर्षांचा आहे. महाराष्ट्र दहशतवादी पथकाने ही कारवाई केली आहे.
नसीरबिन चाऊस हा भारतात अतिरेकी कारवाई करण्याच्या तयारीत होता, असा आरोप त्याच्यावर आहे. सध्या सिरीयात असलेल्या फारूक या अतिरेक्याच्या आदेशावरुन तो याबाबतच्या हालचाली करत होता, त्यामुळेच त्याला एटीएसने अटक केली आहे.
याशिवाय नसीरबिन आयसिसमध्ये सहभागी होण्यासाठी सिरियाकडे जाण्याच्या तयारीत होता, अशी माहितीही समोर आली आहे.